शिरूर कासार (जि. बीड) : शिरूर तालुक्यातील एका तरुणाच्या इन्स्टाग्रामवर ''हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए, आरडीएक्स पहुंच जायेगा. एक, एक लाख मिल जायेंगे, बस बंदे काम करनेवाले चाहिए. अगर तू नहीं कर सकता तो, जो कर सकता है उनका नंबर दे दे ...'' असा मेसेज पाकिस्तानातील कराचीतील एका संशयिताने पाठविल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी तरुणाने शिरूर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताने त्याचे लोकेशन शिरूरच्या तरुणाला पाठवत पाकिस्तानी असल्याचे पटवून दिले आहे. या प्रकरणी बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तू कुठला आहे? विचारणा केल्यावर कराचीमधील लोकेशन पाठवले...तरुणाच्या इन्स्टाग्रामवर आलेल्या मेसेजमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी संशयिताने दिलेली आहे. ११ जुलै २०२५ रोजी जेव्हा शिरूर तालुक्यातील तरुण स्वत:च्या मोबाइलवर रील पाहत होता तेव्हा संशयित आणि तरुणात बाचाबाची होऊन तरुणाने संशयितास तू कुठला आहे? अशी विचारणा केली. तेव्हा संशयिताने पाकिस्तान असे सांगून, कराचीमधील लोकेशन पाठवले. २९ जुलै २०२५ रोजी शिरूर तालुक्यातील तरुणाला संशयिताने एक ऑडिओ पाठवला होता. तरुणाने ३१ जुलै २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीएसआय धनंजय कुलकर्णी यांनी चौकशी सुरू केली आहे.
मुंह खोल, कितना अमाउंट चाहिए...''सोचके बता, हमारा साथ दे, मुंह खोल तुझे कितना अमाउंट चाहिए, हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए, आरडीएक्स पहुंच जायेगा. एक, एक लाख मिल जायेंगे, बस बंदे काम करनेवाले चाहिए. अगर तू नहीं कर सकता तो, जो कर सकता है उनका नंबर दे दे ...'' असा संवाद सदरील ऑडिओमध्ये आहे.