शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

हम भी कम नही ! ... पालिकेनंतर पोलिसांनीही लावले अनधिकृत बॅनर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 11:27 IST

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पालिका व पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी आता सामान्यांमधून पुढे येत आहे. 

ठळक मुद्देजनजागृतीच्या नावाखाली बॅनरबाजी कारवाई करणाऱ्यांची नियमांचे केले उल्लंघन

- सोमनाथ खताळ

बीड : बीड शहरात सध्या अनधिकृत बॅनरबाजीचे चांगलीच चढाओढ लागली आहे. आगोदर पालिकेने आणि आता ‘हम भी कम नही’ असे म्हणत बीड पोलिसांनी देखील अनाधिकृत बॅनर लावून नियमांचे उल्लंघन केले आहे.  कारवाई करणारेच नियम पायदळी तुडवित असल्याने कारवाईची अपेक्षा करायची कोणाकडे? असा सवाल उपस्थित होत आहे. जनजागृतीच्या नावाखाली सध्या प्रशासनच शहराचा चेहरा विद्रूप करताना दिसत आहे. 

बीड शहर सध्या बॅनर, होर्डिंग्जमुळे विद्रुप झाल्याचे दिसत आहे. पालिकेच्या नियमात केवळ २४ ठिकाणीच बॅनर लावण्याची अधिकृत परवानगी आहे. मात्र, शहरात गल्ली बोळात आणि चौकाचौकात मोठे मोठे बॅनर अनधिकृतपणे लावल्याचे दिसतात. याचा त्रास सामान्य नागरिकांसह वाहनधारकांना तर होतच आहे, शिवाय शहराचे विद्रुपीकरणही होत आहे. असे असतानाही याकडे कोणाचे लक्ष नसल्याचे दिसत आहे. 

दरम्यान, ज्या पालिकेने अनाधिकृत बॅनरवर कारवाई करायला पाहिजे, तीच पालिका नियम पायदळी तुडवित आहे. आता पोलिसांनीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत शहरात रस्ता सुरक्षा अभियानचे अनाधिकृत बॅनर लावले आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जनजागृती जरी असली तरी शासनाने ते बॅनर अनधिकृतपणे लावावे, अशी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पालिका व पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी आता सामान्यांमधून पुढे येत आहे. 

म्हणून मुख्याधिकाऱ्यांची प्रतिक्रिया टाळलीया अनधिकृत बॅनरबद्दल पालिकेची प्रतिक्रिया घेणे आवश्यक होते. मात्र, खुद्द पालिकेनेचे अनधिकृत बॅनर लावून नियम पायदळी तुडविल्याने पालिका प्रमुख मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांची प्रतिक्रिया घेणे टाळले. पालिकेने लावलेल्या अनाधिकृत बॅनरबद्दल दोरकुळकर यांच्याशी वारंवार संवाद केला, मात्र, त्यांना उत्तर देता आलेले नाही. तर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना विचारले असता, त्यांनी याबाबत विचारण केली जाईल असे सांगितले. अधिक माहिती अपर पोलीस अधीक्षकांकडे घेण्यास सांगितले. अपर अधीक्षक विजय कबाडे यांच्याशी संपर्क केला, मात्र, त्यांचा भ्रमणध्वणी नेटवर्क मध्ये नसल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :BeedबीडMuncipal Corporationनगर पालिकाBeed policeबीड पोलीस