शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

निधी उचलूनही पाणीपुरवठा योजना अपूर्ण; समितीवर होणार गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 19:08 IST

वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत २००७ मध्ये मंजूर केलेल्या ५७ पैकी ५५ लाख रुपयांचा निधी उचलून योजनेचे काम अर्धवट केले आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठा योजनेसाठी पिंपरखेड येथील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला २७ आॅक्टोबर २०१७ रोजी ५७ लाख रुपयांचा निधी वर्ग समितीच्या पदाधिका-यांनी त्याच दिवशी यातील ५५ लाख रुपये उचलले होते.

बीड : वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत २००७ मध्ये मंजूर केलेल्या ५७ पैकी ५५ लाख रुपयांचा निधी उचलून योजनेचे काम अर्धवट केले आहे. परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारींमुळे जिल्हा परिषद प्रशासन बेजार झाले असून आठवड्यात काम पूर्ण न केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहेत. 

पाणीपुरवठा योजनेसाठी पिंपरखेड येथील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला २७ आॅक्टोबर २०१७ रोजी ५७ लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग केला होता. समितीच्या पदाधिका-यांनी त्याच दिवशी यातील ५५ लाख रुपये उचलले होते. टाकीचे अर्धवट काम तसेच रखडले आहे. 

पाणी वितरण व्यवस्था केली नाही तसेच संपूर्ण गावभर पाईपलाईन करणे आवश्यक असताना तसे न करता योजना पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले. यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्या. परंतु जि.प. कडून समितीशी  पत्रव्यवहार केला जात आहे. अखेर १९ मे रोजी उपोषण करण्यात आले. पिंपरखेड व परिसरात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. हातपंप कोरडे पडले आहेत. गावाला पाणी पुरवठा योजना मंजूर असल्याने टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करता येत नाही. त्यामुळे टंचाईला वैतागलेले ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

मालमत्तेवर निधीचा बोजासमितीच्या कारभाराबद्दल तक्रारी वाढत असल्याने जि. प. प्रशासनाला जनतेच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंत्यांनी समितीच्या अध्यक्ष व सचिवांना प्राप्त निधीतून योजनेची कामे आठ दिवसात पूर्ण करुन घेण्याचे निर्देश दिले. नसता निधी वसुलीसाठी फौैजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. निधीचा बोजा संबंधितांच्या मालगीच्या स्थावर मालमत्तेवर चढवण्याची शिफारस प्रशासनाकडे करण्यात येणार असल्याचे या आदेशात नमूद केले आहे. 

गुन्हा नोंद न झाल्यास आंदोलन शासनाच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी ग्राम पाणी पुरवठा समितीच्या सर्व सदस्यांवर गुन्हा दाखल करावा. तसेच सरपंच व ग्रामसेवकाने ग्रामपंचायतच्या खात्यातील रक्कम काहीच कामे न करता समितीला दिली, त्यामुळे सरपंच व ग्रामसेवकावरही कारवाई करावी. दोषींवर गुन्हा नोंद  न झाल्यास महिला, पुरुष ग्रामस्थांसोबत पाणी मांगो आंदोलन करावे लागेल.- राम शिंदे, पिंपरखेड

टॅग्स :WaterपाणीBeedबीड