शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

केजच्या शिक्षक कॉलनीत पाणीटंचाई; रहिवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:40 IST

केज : शहराच्या पश्चिम बाजूस असलेल्या शिक्षक कॉलनीसह परिसरात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या घरातील बोअरवेल गेल्या दोन महिन्यांपूर्वीच आटल्याने नागरिकांना टँकरने विकत पाणी घ्यावे लागत आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून मागणी करूनही नळयोजना करण्यात आली नसल्याने शिक्षक कॉलनीसह परिसर आजही तहानलेलाच आहे.लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने विस्तारित शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध ...

ठळक मुद्देबोअरवेल आटले; नळ योजना नाही

केज : शहराच्या पश्चिम बाजूस असलेल्या शिक्षक कॉलनीसह परिसरात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या घरातील बोअरवेल गेल्या दोन महिन्यांपूर्वीच आटल्याने नागरिकांना टँकरने विकत पाणी घ्यावे लागत आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून मागणी करूनही नळयोजना करण्यात आली नसल्याने शिक्षक कॉलनीसह परिसर आजही तहानलेलाच आहे.

लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने विस्तारित शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास नगरपंचायत कमी पडत आहे. शिक्षक कॉलनीसह परिसरात हजारो नागरिकांनी गेल्या २५ वर्षापासून कॉलनीत पाणीपुरवठा करण्यासाठी नळयोजना चालू करावी, या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलने केली; मात्र, कोणत्याही प्रकारची योजना आजतागायत राबविण्यात आली नसल्याने परिसरातील रहिवाशांनी पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून न राहता घरोघरी बोअरवेल घेत पाण्याचा प्रश्न तात्पुरता सोडवला. मात्र, कडक उन्हामुळे दोन महिन्यांपूर्वी बोअरवेलचे पाणी आटले.

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबाबत नगर पंचायतीने दुर्लक्ष केल्याने नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. शिक्षक कॉलनीलगतच शहराला पाणीपुरवठा करणारी योजना कार्यान्वित असताना नागरिकांना मात्र टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे चित्र केज शहरात दिसते. या बाबतीत अधिक माहितीसाठी केज नगरपंचायतच्या मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. शिक्षक कॉलनीसह परिसरातील बोअरवेल गेल्या दोन महिन्यापूर्वी आटल्यानंतर नगरपंचायतकडे पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांनी केली. मात्र, नगरपंचायतने पाण्याची पर्यायी व्यवस्था केली नसल्याने नागरिकांना तीन हजार लिटरचे पाण्याचे टँकर नऊशे रुपयांस घ्यावे लागत असल्याचेही दत्ता धस म्हणाले.पाण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष - दत्ता धसशिक्षक कॉलनी व परिसरातील नागरिकांनी गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलने केली. मात्र, अद्यापही या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी नळयोजना राबविले आलेली नसल्याने पाण्यासाठी नागरिकांनी बोअरवेल घेतले. मात्र ते उन्हाळ्यात आटत असल्याने नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे अशी माहिती या भागातील रहिवासी दत्ता धस यांनी दिली.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाईMarathwadaमराठवाडा