शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

'जलयुक्त' नंतर ‘जलशक्ती’मुळे मिळणार बीड जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 13:24 IST

केंद्र सरकार ‘जलशक्ती’ हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबवणार  

ठळक मुद्दे‘मन की बात’ कार्यक्रमात बीडचा उल्लेख महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांचा समावेश 

- प्रभात बुडूख 

बीड : जिह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाच्या व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने जलसंधारणाच्या अनेक योजना राबवल्या आहेत. यावर्षी केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘जलशक्ती’ हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबवला जाणार असून, यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामासोबतच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. 

‘जलशक्ती’ योजनेद्वारे पाणी बचत व जलपुनर्भरण, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन पारंपरिक पाण्याच्या स्त्रोत जिवंत करणे तसेच सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारतीचे पाणी एकत्र करुन जल पुनर्भरण करण्यात येणार आहे. यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. हा कार्यक्रम संपूर्ण देशभरात राबवला जाणार असून राज्यातील ८ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

राज्य शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार योजना अतिशय प्रभावीपणे जिल्ह्यात राबवण्यात आली आहे. या योजनेचा परिणाम देखील चांगला दिसून आला आहे. तसेच पाणी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या कामांमुळे त्या परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे जलयुक्त योजनेच्या धरतीवर केंद्राच्या ‘जलशक्ती’ योजनेचा समावेश झाल्यामुळे जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना गती मिळणार आहे. 

‘मन की बात’ कार्यक्रमात बीडचा उल्लेख जलशक्ती योजनेच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी झालेल्या रेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये माहिती दिली. यावेळी हा कार्यक्रम देशभरात राबवला जाणार असून, महाराष्ट्रातील ८ जिल्ह्याचा समावेश आहे. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्याचा उल्लेख केला व हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवल्यावर जिल्ह्यातील दुष्काळावर मात करता येऊ शकते असे देखील ते यावेळी म्हणाले असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. 

जिल्हा प्रशासन लागले कामालाकेंद्र शासनाचा कार्यक्रम असल्यामुळे जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, जलसंधारण तसेच संबंधीत सर्व विभागत योजनेचा शुभारंभ करण्यापुर्वी करण्यात येणाऱ्या तयारीला लागले असल्याची माहिती आहे. 

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांचा समावेश जलशक्ती या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील नाशिक, बीड, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, बुलडाणा, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

टॅग्स :WaterपाणीCentral Governmentकेंद्र सरकारBeedबीडJalyukt Shivarजलयुक्त शिवार