शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पाच राज्यात 'वॉन्टेड' असलेला कुख्यात गुंड परळीत जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 15:54 IST

आरोपीवर महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यात विविध ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत. 

परळी (बीड ) : लुटमार, चोरी, फसवणुक व चैन स्नॅचींग अशा गुन्हयात पाच राज्यातून फरार असलेला कुख्यात गुंड इरफान खॉन शरीफ खॉन (३२, रा. परळी)  यास दाऊतपूरच्या नविन औष्णिक विद्युत केंद्राजवळील सेलू झोपडपट्टीत संभाजीनगर व परळी शहर पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी (दि. २८ )पहाटे अटक केली. आरोपीवर महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यात विविध ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत. 

परळी शहरातील इराणी वस्तीमध्ये राहणारा फरार आरोपी इरफान खॉन शरीफ खॉन हा बाहेरील जिल्ह्यात व राज्यात लुटमार, चोरी व फसवणुक व चैन स्नॅचींग सारख्या गुन्ह्यात फरार होता. तसेच येथील संभाजीनगर पोलिस स्टेशन व परळी शहर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे व जातीवाचक शिवीगाळ करणेचा गुन्हा दाखल होता. तो अनेक वर्षापासुन फरार असल्याने येथील इराणी वस्ती मध्ये त्यास पकडण्याचा प्रयत्न पोलिसांनी अनेकवेळा केला. परंतु तो हुलकावणी देत असत.

गुरुवारी इरफान नविन औष्णिक विद्युत केंद्राजवळील सेलू येथील झोपडपट्टीमध्ये असलेल्याची माहिती डीबी पथक प्रमुख रमेश सिरसाट यांना मिळाली. यावरून पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी आरोपीस पकडण्यासाठी एक पथक तयार केले. अंबाजोगाईचे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक अजित बोर्‍हाडे यांचे या कामी मार्गदर्शन घेण्यात आले.  संभाजीनगर  आणि परळी शहरचे डी.बी.पथक  सेलूच्या झोपडपट्टीत गेले. याठिकाणी  चारही बाजुने घेराव करत इरफानच्या मुसक्या आवळल्या.

अंबाजोगाईचे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक अजित बोर्‍हाडे, संभाजीनगर पोलिस ठाण्याचे परळीचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनुसया माने, संभाजीनगर डी.बी.पथक प्रमुख रमेश सिरसाट, दत्ता गित्ते, सविता दहिवाळ, मोहन दुर्गे, परळी शहरचे डी.बी.प्रमुख बाबासाहेब बांगर, माधव तोटेवाड यांनी आरोपीस ताब्यात घेतले. पुढील तपास सपोनि सलीम पठाण हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकBeedबीड