Walmik Karad ( Marathi News ) : पवन चक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणातील संशयीत आरोपी वाल्मीक कराड याच्याविरोधात काल मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. काल कराड याला न्यायालयात दाखल करण्यात आले होते, यानंतर न्यायालयातून रुग्णालयात तपासणीसाठी हजर करण्यात आले. यानंतर रुग्णालयातून बाहेर पडत असताना वाल्मीक कराड याने रोहित कुठे आहे? , असा प्रश्न केला. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा रोहित आहे तरी कोण असे प्रश्न उपस्थित केले, यावर आता भाजपा आमदार सुरेश धस यांनी उत्तर दिले आहे.
वाल्मिक कराडवरील गुन्ह्यांची यादी कोर्टात; "हत्येच्या दिवशी १० मिनिटांचं संभाषण..."
काल न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर कराड याला रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले. यावेळी रुग्णालया बाहेर वाल्मीक कराड याच्या समर्थकांनी गर्दी केली होती, यावेळी पोलिसांची संरक्षण मोठ्या प्रमाणात होते. पोलीस व्हॅनमध्ये बसत असताना वाल्मीक कराड याने रोहित कुठे आहे?, असा प्रश्न केला. यावेळी पोलिसांनीही रोहित कुठे आहे, असं म्हणत बोलवायला सुरूवात केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कराड याने बोलावलेला रोहित नेमका कोण आहे? याचे उत्तर भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिले आहे. आमदार धस म्हणाले, रोहित हा त्याच्या हाताखाली काम करणारा कर्मचारी आहे. त्याच नाव रोहित कांबळे आहे. त्याची मदत लागत असेल. त्यालाही पोलिसांच्या गाडीत बसवून नेलं आहे, असंही आमदार धस म्हणाले.
"वाल्मीक कराड याला मी भेटलेलो नाही. कराड याच्याबरोबर वाईट काय होते, त्याचे आणि माझे चांगले संबंध होते. पण, अशी माणस मारायला लागल्यावर त्याच्यासोबत मी रहायचे का?,असा सवालही आमदार धस यांनी केला. अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीची कार्यकारणी बरखास्त केली, यावर बोलताना आमदार धस म्हणाले, ते आता कारवाई करणार.ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते आता नवीन कार्यकारणी जाहीर करतील. विष्णू चाटे तालुका अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांनी रद्द केली, असंही आमदार सुरेश धस म्हणाले.