शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात सात लाख शेतकऱ्यांना बोंडअळी अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:49 IST

बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतक-यांचे बोंडअळीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ अनुदान देऊन शेतक-यांना आधार देण्याची मागणी झाली होती. सरसकट अनुदान द्यावे, यासाठी आंदोलनही उभारले. त्यानंतर सरकारला जाग आली आणि अनुदान देण्याची घोषणा केली. परंतु अद्यापही ही घोषणा कागदावरच असून जिल्ह्यातील सात लाख शेतक-यांना या अनुदानाची प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतक-यांमध्ये संतापाची तीव्र लाट असून अनुदान देण्याची मागणी आहे.

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतक-यांचे बोंडअळीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ अनुदान देऊन शेतक-यांना आधार देण्याची मागणी झाली होती. सरसकट अनुदान द्यावे, यासाठी आंदोलनही उभारले. त्यानंतर सरकारला जाग आली आणि अनुदान देण्याची घोषणा केली. परंतु अद्यापही ही घोषणा कागदावरच असून जिल्ह्यातील सात लाख शेतक-यांना या अनुदानाची प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतक-यांमध्ये संतापाची तीव्र लाट असून अनुदान देण्याची मागणी आहे.

बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून दोन महिने झाले. परंतु अनुदानाचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. बोंडअळीमुळे आगोदरच कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यातच अनुदान न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच शासनाने ठरवलेला हमीभावही अत्यल्प होता. बोंडअळीच्या संकटामुळे खुल्या बाजारपेठेत देखील गतवर्षीपेक्षा भाव कमी होता. कापूस लागवडीवरील उत्पादन खर्च देखील निघाला नाही. एकीकडे बोंडअळीचे संकट व दुसरीकडे कमी भाव, आणि शासनाने न दिलेल्या अनुदानामुळे शेतकरी तिहेरी संकटात सापडला आहे.

बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान देण्याची शासनाची इच्छाच नव्हती, अशी शेतकºयांमध्ये चर्चा आहे. कारण सुरूवातीला जिल्ह्यातील ६३ मंडळापैकी फक्त १८ मंडळातील कापूस लागवडीचे पंचनामे करून अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर शेतकºयांनी केलेल्या आंदोलनाच्या रेट्यापुढे शासन नमले व जिल्ह्यात सरसकट अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र, ही घोषणा कागदावरच असल्यामुळे शेतकºयांच्या प्रश्नासंदर्भात शासन उदासीन असल्याचा आरोप होत आहे.

पीकविमाही तात्काळ द्यावागतवर्षी पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी पीकविम्याची रक्कम मिळाली होती. त्याच आशेने या वर्षी शेतकºयांनी स्वत: खिशातील पैसे घालून पीकविमा भरला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या हक्काचे पीकविम्याचे पैसे देण्याची तात्काळ देण्याची मागणी होत आहे. हे पैसे वेळेत मिळाले तर येणाºया हंगामासाठी शेतकºयास मदत होणार आहे.

अधिका-यांनी केलेल्या पंचनाम्यावर प्रश्नचिन्हबोंडअळीने बाधित बागायती क्षेत्रास १३५०० रूपये अनुदान आहे. तर जिरायत क्षेत्रासाठी ६८०० रुपये. जिल्ह्यातील अंबाजोगई तालुक्यात फक्त ६१.५ एवढे बागायती क्षेत्र दाखवण्यात आले आहे. तर बाकी सर्व तालुक्यात ३७७६९२.२ हेक्टर क्षेत्र जिरायत दाखवण्यात आले आहे. त्यामुळे पंचनामे करणाºया अधिकाºयांनी पारदर्शक कारभार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असून त्यांनी केलेल्या पंचनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

टॅग्स :BeedबीडcottonकापूसMarathwadaमराठवाडाagricultureशेती