लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कापूस पिकावर झालेल्या बोंडअळी प्रदुर्भावामुळे कापूस क्षेत्राचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई म्हणून शासनाच्या वतीने २५६ कोटी बोंडअळी अनुदान जाहीर केले होते. हे अनुदान तीन टप्प्यात देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र तिस-या टप्प्यातील ८५.१३ कोटी अनुदान अजूनही न मिळाल्यामुळे अनेक गावातील शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत, त्यामुळे शेतक-यांमधून संताप व्यक्त होत आहे.खरिप संपून रब्बी हंगाम सुरु झाला आहे, परंतु पाऊस नसल्यामुळे रब्बीची पेरणी होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. मागील वर्षी झालेल्या बोंडअळी अनुदानाची जाहीर केलेली रक्कम अजूनही मिळाली नसल्यामुळे, शासनाला बोंडअळी अनुदानाच्या तिसºया हप्त्याचा विसर पडला आहे का? असा सवाल शेतकरी विचारत आहेत. पहिल्या दोन टप्प्यात मिळालेल्या अनुदानाची रक्कम शेतकºयांना योग्य पद्धतिने वाटप होत नाही, इतर बँकेकडून पैसे मिळत नसल्याचे सांगून जिल्हा बँकेकडून अडवणूक केली जात आहे. अशी महिती शेतकºयांनी दिली.शासनाने बोंडअळी बाधित शेतकºयांना २५६ कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी पहिल्या टप्पा जून महिन्यात ६८.२३ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर जूलै महिन्यात दुसरा हप्ता १०२ कोटी ६४ लाख रुपये शासनाच्या वतीने देण्यात आले. यामध्ये पात्र असलेल्या अनेक गावातील शेतकºयांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे पहिल्या दोन टप्प्यतील संपूर्ण रक्कम त्वरीत शेतकºयांच्या खात्यावर त्वरीत जमा करण्यात यावी, व तिसºया टप्प्यातील अनुदानाचे ८५.१३ कोटी रक्कम वाटपासाठी जिल्हा बँकेकडे न देता राष्ट्रीयकृत बँकेकडे देण्यात यावी अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.३ लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्रावर झाला होता प्रादुर्भावजिल्ह्याचे संपूर्ण अर्थकारण हे कापूस पिकावर अवलंबून आहे. मात्र, बोडअळी प्रदुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील ३ लाख ७८ हजार हेक्टरवरील कापूस पिक धोक्यात आले व शेतकºयाचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. अनुदानाची रक्कम न मिळाल्यामुळे शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शेतकऱ्यांना बोंडअळी अनुदानाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:37 IST
अनेक गावातील शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत, त्यामुळे शेतक-यांमधून संताप व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना बोंडअळी अनुदानाची प्रतीक्षा
ठळक मुद्देशेतक-यांमध्ये तीव्र संताप : अनुदानाचा तिसरा हप्ता पाठवण्याचा शासनाला पडला विसर