बीड : लोकशाहीत मते मागण्याचा अधिकार सर्वांना आहे. विकासाच्या मुद्यावर कुणी मत मागत नाही तर पोरखेळ वृत्तीने झिरो असणारे हिरो होण्याचा प्रयत्न करतात. मतदारांना विकास हवा असतो आज केलेली चूक विकासाला खीळ घालणारी ठरेल म्हणून युतीचे सरकार सत्तेवर येणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले. मंगळवारी सायंकाळी बार्शी नाका, परिसरात जाहीर सभेत ते बोलत होते.बीड जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव म्हणाले की, एक अभ्यासू व विचारसंपन्न नेतृत्व म्हणून अण्णांना निवडून द्या. सर्व सामाजातील मतदार अण्णांवर खुल्या मनाने प्रेम करतो. जयदत्त क्षीरसागर यांना मताधिक्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जयदत्त क्षीरसागर म्हणाले, सरकारच्या योजना आणून राबवण्यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा करावा लागतो. पाणी, वीज, सडक या महत्त्वाच्या प्रश्नांसाठी निधी उपलब्ध करुन ही कामे होत असल्याचे ते म्हणाले.या वेळी बार्शीनाका, अशोक नगर, इमामपूर रोड परिसरातील शिवसैनिक, महिला, नागरिक, युवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनिल जगताप, प्रा.जगदीश काळे, बप्पासाहेब घुगे, बाळासाहेब आंबुरे, नितीन धांडे, सुशील पिंगळे, गोरख शिंगन, संजय उडान, लक्ष्मण विटकर, सागर बहीर, भगीरथ बियाणी, सर्जेराव तांदळे, दिनकर कदम, विलास बडगे, सुनील सुरवसे, सुधीर भांडवले आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.मित्रनगर, दत्तनगर, चाणक्यपुरी परिसरात कॉर्नर बैठकबीड : शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवर जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी मित्रनगर, दत्तनगर, चाणक्यपुरी, शिवाजीनगर परिसरात कॉर्नर बैठक झाली. यावेळी सर्जेराव तांदळे म्हणाले की, राष्ट्रवादीने महिला उमेदवार दिला नाही, सर्वच क्षेत्रात महिलांना प्राधान्य द्यायला हवे, पण त्यांना महिलांचे महत्त्व वाढवायचे नव्हते. आम्ही बीड जिल्ह्यात दोन जागांवर महिला उमेदवार निवडणार आहोत.विनोद मुळूक म्हणाले, अण्णांच्या व अध्यक्षांच्या पाठपुराव्यामुळे शहरातली कामे चालू आहेत. ती भविष्यासाठी बीडकरांना मोकळा श्वास देणारी ठरणार आहेत. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, बीडची पुढची दिशा काय असावी, बीड कसं असावं याचा विचार महत्त्वाचा आहे. शहराचे आणि समाजाचे हित कशात आहे, हे बीडचा मतदार चांगले ओळखतो. त्यामुळे आम्हाला पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
मतदारांना विकास हवा असतो; चूक झाल्यास विकासाला खीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 00:03 IST
मतदारांना विकास हवा असतो आज केलेली चूक विकासाला खीळ घालणारी ठरेल म्हणून युतीचे सरकार सत्तेवर येणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
मतदारांना विकास हवा असतो; चूक झाल्यास विकासाला खीळ
ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : पाणी, वीज, रस्त्यांसाठी प्रयत्न राहणार