शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘विठ्ठलाचा भार आता या विटेला वाटतो !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:26 IST

मल्हारीकांत देशमुख । लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : भगवानराव लोमटे सभागृहात डॉ. इक्बाल मिन्ने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गझल संमेलनाला ...

ठळक मुद्देमराठवाडा साहित्य संमेलनात प्रथमच गझलकारांच्या रचनांनी तरुणाईला भरती

मल्हारीकांत देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : भगवानराव लोमटे सभागृहात डॉ. इक्बाल मिन्ने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गझल संमेलनाला युवा महोत्सवाचेच स्वरूप प्राप्त झाले होते. सळसळती तरुणाई व दर्जेदार झालेले सादरीकरण यामुळे गझलनगरीत पाय ठेवायला जागा राहिली नव्हती. रसिकांची गर्दी खेचणारा कार्यक्रम म्हणून या संमेलनाने नोंद घ्यावी, अशी एकंदर परिस्थिती निर्माण झाली होती. साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच मराठी गझलला व्यासपीठ मिळाल्यामुळे तरुण गझलकारांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. श्रोत्यांमध्ये तरुणींसह महिलांची उपस्थिती व सहभाग हे या गझल संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.लातूर येथील प्रा. संतोष कुलकर्णी यांची‘मराठी गझल पुढे जात आहे,मराठीसही ती पुढे नेते आहे’गझलेला टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.दास पाटील, योगिता पाटील यांच्याही गझला उत्तम होत्या. नांदेड येथील प्रफुल्ल कुलकर्णी यांनी‘मोठ्याला मोठे म्हणण्याला धीर हवागुन्हा नको, आरोप तरी गंभीर हवा’हा शेर सादर करीत दाद मिळविली. सुहासिनी देशमुख यांनी‘तुझ्या भोवती खुळा पाश आहेक्षणाचा विसावा पुन्हा नाश आहेनको दोन डगरींवर पाय आताअशा वागण्यात पुरा नाश आहे...’ही गझल सादर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.सेलू येथील संजय विटेकरांनी,‘वयाने जरासा ढळू लागलोतसा मी मला कळू लागलो...’ही गझल सादर केली. उदगीर येथील शिव डोईजोडे या युवकानेती डोळ्याने बोलत गेलीमी नंतर भाषांतर केलेरंगत आली कथा नेमकीउगीच का मध्यंतर झाले...म्हणताच उपस्थित युवांनी जल्लोष केला.कळंब येथील सचिन क्षीरसागर यांनी‘युगायुगांचा त्रास हाटिपेला गेला वाटतोविठ्ठलाचा भार या विटेला वाटतो’ही मार्मिक गझल ऐकवली.प्रा. शेखर गिरी यांनी,दाबून तोंड माझे, पाठीत वार झालामजला छळावयाचाऐसा प्रकार झालामाझी तशी सुपारीकोणीच घेत नव्हतेमाझाच दोस्त सालातेव्हा तयार झाला’अशी कोटी सादर केली.उस्मानाबाद येथील बाळ पाटील या युवकाच्या‘हसू वाटते, पण हसू देत नाहीजखम ही ‘मुळाची’ बसू देत नाहीसदा काश्मिराचा नकाशा मुखावरकधी तो खुशाली असू देत नाही’या व्यंगात्मक गझलेने उपस्थितांची हसून हसून मुरकुंडी उडालीनांदेड येथील अरविंद सगर या युवकाने,‘गळी लागला तो विषारी निघालातिचा चेहराही शिकारी निघालाआता माकडाचे बघून सर्व चाळेदिली ज्या सत्ता, तो मदारी निघाला’हे राजकीय व्यंग गझलेतून मांडले.रवींद्र केसकर या गझलकाराने‘कोणी गुलाम झाला,कोणी ‘आमिर’ झालाज्याला न जात काही,तो कबीर झाला’असे सामाजिक आशयाचे शेर सादर केले.बडवणी येथील सतीश दराडे यांनी,आतल्या कोलाहलाला,बांग देता येत नाहीगाढ निद्रेतून हल्ली,जाग येता येत नाही’अशी गझल सादर केली.वैभव देशमुख या युवकाने,‘संबंध कधी मी आपला,कुणाला सांगत नाहीगंध तुझ्या प्रेमाचा,या उरात मावत नाहीसूर्याभोवती फिरती ही धरा,किती युगांचीहा सूर्य मिठी एखादीका देऊन टाकीत नाही’अशी शृंगारिक रचना सादर केली.राज पठाण, प्रथमेश तुगावकर, विजय आव्हाड, योगीराज माने यांच्या गझलांना उपस्थित रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.गझल संमेलनाची सांगता औरंगाबाद येथील डॉ. इक्बाल मिन्ने यांच्या‘बोलतो मराठी, ऐकतो मराठीहीच माय माझी, मानतो मराठीजन्मलो येथे मी भारतीय मुस्लिमरोज रोज मी दुवाही मागतो मराठी’या गझलेने कार्यक्रमाची सांगता झाली.

सचिन क्षीरसागर ठरला हिरोकळंब येथील अल्पशिक्षित सचिन क्षीरसागर हा युवक उदरनिर्वाहासाठी पानटपरी चालवितो. या युवकाचे सादरीकरण उपस्थितांना मनोमन भावले. राजकीय व्यंग टिपताना तो म्हणतो,चालते फुरफुर कुणाची, तर कुणी खिंकाळतोसंसदेचा हॉल आज घोड्याचा तबेला वाटतोजातिधर्माचे वाढतो स्तोम व्यक्त करताना त्याच्या ओळी लक्षणीय होत्या...लटकतो खोपा कुठे, कुठे हिरवा कुठे भगवा, निळापाखरांनी आज जातीवाद केला वाटतो’सचिनच्या प्रभावी सादरीकरणामुळे तो गझल संमेलनाचा ‘हिरो’ ठरला.

टॅग्स :Marathwada Sahitya Sammelanमराठवाडा साहित्य संमेलन