शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांची व्हीआयपी ‘एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:25 IST

महागड्या कारमधून चार चोरटे आले. करोडो रूपयांच्या इमारतीत शिरले. आम्ही कुरीअरवाले आहोत, असे सांगून घराची माहिती घेतली. सर्व शांतता झाल्याचे समजताच अवघ्या पाच मिनिटात घर फोडून हजारो रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले. बीड शहरात एकाच दिवशी या दोन घटना घडल्या. आता चोरटेही ‘व्हीआयपी’ झाल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी मात्र सावध राहण्याची आवश्यकता आहे.

ठळक मुद्देबीडमधील प्रकार : महागड्या कारमधून आले अन् कुरिअरवाले असल्याचे सांगून दोन घरे फोडून गेले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : महागड्या कारमधून चार चोरटे आले. करोडो रूपयांच्या इमारतीत शिरले. आम्ही कुरीअरवाले आहोत, असे सांगून घराची माहिती घेतली. सर्व शांतता झाल्याचे समजताच अवघ्या पाच मिनिटात घर फोडून हजारो रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले. बीड शहरात एकाच दिवशी या दोन घटना घडल्या. आता चोरटेही ‘व्हीआयपी’ झाल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी मात्र सावध राहण्याची आवश्यकता आहे.मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी चोरी करण्याचे नवनवीन फंडे वापरल्याचे समोर येत आहे. बीडमध्येही असेच दोन प्रकार समोर आले आहेत. एखादा नेता किंवा वर्ग एक च्या अधिकाऱ्यासारख्या गाडीतून रूबाबात येत चोरटे सहज घर फोडून निघून जात असल्याचे दिसून येत आहे. बीड शहरातील चाणक्य पुरीत राहणारे व गेवराई पंचायत समितीचे कृषी अधिकारी अनिरुद्ध ज्ञानोबा सानप यांच्या घरातून ६७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यामध्ये चोरटे पांढºया शुभ्र कारमधून आले. सानपे यांच्या घराच्या दुसºया मजल्यावर गेले. येथे खालच्या घरचे कोठे गेले? आम्ही कुरीअरवाले आहोत, असे सांगितले. शेजाºयांनी ते गावी लग्नाला गेल्याचे सांगून त्यांना सोडण्यास बाहेर आले. पाच मिनीटांनी चोरटे एक चक्कर मारून पुन्हा सानप यांच्या घराजवळ आले आणि अवघ्या पाच मिनिटात घर फोडून ऐवज लंपास करत रूबाबात पोबारा केला. असाच प्रकार कालिकानगर भागातही घडला. येथे रमेश सानप यांच्या घरातून ६८ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास केला. तपास पोउपनि आर.ए.सागडे, बी.एस.ढगारे हे करीत आहेत.अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.नवीन टोळ्या असल्याने तपास अवघडमागील काही दिवसांपासून नवीन टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. रेकॉर्डवरील चोरट्यांची स्टाईल पोलिसांना माहिती असते. मात्र आता नवीन चोरटे आल्याने त्यांना घटनेचा तपास लावणे अवघड बनत आहे. मागील काही दिवसांत पकडलेले चोरटे हे नवखे असल्याचे दिसून येते. त्यांना पकडणे हे पोलिसांसाठी आव्हान आहे.अनोळखी व्यक्तींपासून सावध राहाघरात किंवा परिसरात एखादी व्यक्ती अनोळखी दिसल्यास तात्काळ तिला हटका. त्यांचे खरच काम आहे, की उद्देश वेगळाच याची तपासणी करावी. दुर्लक्ष केल्यास घटना घडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अनोळखी व्यक्तींपासून सावध रहावे. चोरटे वेगवेगळा बहाणा करून घरात प्रवेश करून चोरी करीत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध रहावे.नागरिकांनो, दर्जेदारकुलूप बसवा !‘लाखोंचे घर आणि १०० रुपयांचे कुलूप’ या मथळ्याखाली लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर काही लोकांनी याबाबत दर्जेदार कुलूप बसविले. मात्र काही लोक आजही याबाबत अनभिज्ञ आहेत. चाणक्यपुरतील लाखोंच्या बंगल्याला किरकोळ कुलूप होते. त्यामुळेच चोरटे सहज घरात शिरले. आतातरी नागरिकांनी जागरूक होण्याची गरज आहे.चोरीचे नवनवीन फंडेमागील काही दिवसांपासून चोरटे सक्रीय झाले आहेत. जुन्या गुन्हेगारांना शोधणे पोलिसांना शक्य असते. मात्र नवख्या गुन्हेगारांची चोरी करण्याची मोडस आणि ते रेकॉर्डवर नसल्याने शोधण्यात अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे चोरट्यांचे नवनवीन फंडेही अनेकवेळा अचंबित करणारे असतात. त्यामुळे पोलिसांसमोर एक आव्हान निर्माण झाले आहे.

टॅग्स :BeedबीडtheftचोरीBeed policeबीड पोलीस