कडा : नवरा बायकोचे किरकोळ वाद टोकाला गेल्याने पत्नी पथर्डी तालुक्यातील टप्पा पिंपळगाव येथे आपल्या आपल्या माहेरी जात होती. दरम्यान शिरुर तालुक्यातील मानूर येथील गावातील मंदिराजवळ बसली होती. पण याच वेळी येथून जात असलेल्या एका सत्तर वर्षीय वृध्दाने शेंगदाणे, फुटाणे व दोनशे रुपये देतो असे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना शिरूर तालुक्यातील मानूर येथे शनिवारी सकाळी घडली.आष्टी तालुक्यातील येथील बावीस वर्षीय विवाहित महिलेचे तिच्या पती सोबत घरगुती किरकोळ वाद झाल्याने ती घरातून रुसुन आपल्या पाथर्डी तालुक्यातील टप्पापिंपळगाव येथे माहेरी जाण्यासाठी जात होती. दरम्यान मानूर गावालगत असलेल्या मंदिराजवळ बसलेली असताना, याच रस्त्याने येत असलेला आरोपी रामा भागूजी गायकवाड (वय ७० वर्ष, रा. टप्पापिंपळगाव तालुका पाथर्डी) याने पीडितेला शेंगदाणे, फुटाणे देतो व दोनशे रुपये देतो असे आमिष दाखवून शेजारील ओढ्यात नेऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन आरोपी रामा गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वाघ करीत आहेत.
२०० रुपयांचे आमिष दाखवत वृध्दाचा विवाहितेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:51 IST
नवरा बायकोचे किरकोळ वाद टोकाला गेल्याने पत्नी पथर्डी तालुक्यातील टप्पा पिंपळगाव येथे आपल्या आपल्या माहेरी जात होती.
२०० रुपयांचे आमिष दाखवत वृध्दाचा विवाहितेवर अत्याचार
ठळक मुद्देमानूर : आरोपीला न्यायालयीन कोठडी