शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

वाहन निरीक्षकपदी रुजू होण्याआधीच परवान्यात खाडाखोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 20:03 IST

बीड जिल्ह्यातील परिवहन कार्यालयातील गलथानपणा चव्हाट्यावर

ठळक मुद्देया प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बीड : शिरूर कासार तालुक्यातील घाटशीळ येथील अनघा नंदकिशोर थोरात हिने सहायक मोटार वाहन निरीक्षकपदी रुजू होण्याआधीच आरटीओ कार्यालयातील एका लिपिकासह अन्य मुलीच्या साथीने वाहन परवान्यात खाडाखोड केली. हा सर्व प्रकार आयुक्त कार्यालयातील कागदपत्र पडताळणीतून उघड झाला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अनघा नंदकिशोर थोरात हिची एमपीएसीअंतर्गत सहायक मोटार वाहन निरीक्षक म्हणून निवड झाली होती. रुजू होण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहन चालविण्यासह त्याचा परवाना असणे बंधनकारक आहे. अनघाकडे अहमदनगर येथील वाहन परवाना होता; परंतु त्याचा कालावधी वैध होत नव्हता. त्यामुळे तिने बीडमधील आदर्शनगर येथील रेवती अजय जोगदंड हिच्या नावाच्या परवान्यात सर्वच बदल केले. एआरटीओ कार्यालयातील सतीश इंगोले या लिपिकाच्या मदतीने छाननी व मंजूरही करून घेतले. त्यानंतर भरती होण्यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात बोलावण्यात आले. येथील संगणकात तपासणी करताच दोन वाहन परवाने दिसले. 

त्यानंतर आयुक्त कार्यालयाने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्र पाठवून खुलासा करण्यास सांगितले. याबाबत चौकशी केली असता यात घोळ असल्याचे उघड झाले. प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवाड यांनी याबाबबत या तिघांवरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.  त्याप्रमाणे अनघा थोरात, रेवती जोगदंड व आरटीओ कार्यालयाचाच लिपिक सतीष इंगळे याच्याविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि सुजित बडे करीत आहेत.

वाहन परवान्यात खाडाखोड करण्यासह संगणक प्रणालीतही बदल केल्याचे प्राथमिक चौकशीतून उघड झाले. त्यामुळे एका लिपिकासह घोळ करणाऱ्या दोघींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याची तपासणी करण्यात येणार आहे. - संजय मैत्रेवाड, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड

एजंटच्या मदतीने केला घोळ?या प्रकरणात खाजगी एजंटही सहभागी असण्याची शक्यता आहे. बीडच्या कार्यालयात सर्रासपणे एजंट वावरत असतात. त्यामुळे या प्रकरणात अप्रत्यक्ष एजंटचा हात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.  

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसBeedबीडCrime Newsगुन्हेगारी