शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

विनायकची यशोगाथा, यू-ट्युबवरील अभ्यासक्रम पाहून नीटमध्ये 595 गुण; आईने घरकाम करून दिला आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 11:31 IST

विनायक याचे दहावीचे शिक्षण माजलगाव येथे झाले. दहावीत असताना तो स्वतः म्हशीचा सांभाळ करून दूध वाटप करून आईला आर्थिक हातभार लावत असे. 

अविनाश मुडेगावकर -

अंबाजोगाई (जि. बीड) : कसल्याही भौतिक सुविधा नाहीत. ना शिकवणी, ना कसला आधार. केवळ यू-ट्युबवरील अभ्यासक्रमांचे व्हिडिओ पाहून विनायक अर्जुन भोसले याने नीट परीक्षेत ५९५ गुण प्राप्त केले आहेत. अंगी जिद्द व चिकाटी असेल तर आर्थिक स्थिती अडसर ठरत नाही, याचा प्रत्यय विनायक भोसले याने समाजासमोर ठेवला आहे. परळी तालुक्यातील सेलू येथील विनायक अर्जुन भोसले याच्या वडिलांचे २०१४मध्ये अपघाती निधन झाले. पतीच्या निधनानंतर खचून न जाता विनायकची आई सुनीता यांनी लोकांच्या घरची धुणी-भांडी करून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले. त्यांना दोन मुलगे व एक मुलगी आहे. मुलांच्या शिक्षणासाठी सुनीताबाई यांनी अंबाजोगाई गाठले. तिथे त्यांनी धुणी-भांडी करण्याचे काम सुरू केले. छोट्याशा भाड्याच्या खोलीत हे चार जणांचे कुटुंब राहते. याच ठिकाणी सर्वजण एकत्रित अभ्यास करतात. विनायक याचे दहावीचे शिक्षण माजलगाव येथे झाले. दहावीत असताना तो स्वतः म्हशीचा सांभाळ करून दूध वाटप करून आईला आर्थिक हातभार लावत असे. मात्र, अंबाजोगाईत चांगले शिक्षण असल्याने भोसले कुटुंब इथे स्थायिक झाले. आईचे कष्ट व आर्थिक परिस्थिती याची जाणीव ठेवून विनायकने डॉक्टर होण्याची जिद्द मनात बाळगली. नीटच्या शिकवणीची फी भरू शकत नसल्याने त्याने यू-ट्यूबवर अभ्यासक्रमाचे व्हिडिओ पाहून मेहनतीने अभ्यास केला व नीटच्या परीक्षेत ५९५ गुण प्राप्त केले. 

टॅग्स :BeedबीडStudentविद्यार्थीYouTubeयु ट्यूब