लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : मराठवाड्यात सर्वात जुना व कार्यक्षेत्राने मोठा असलेला साखर कारखाना म्हणून अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. मागील ५ वर्ष बंद असलेला कारखाना सुरु होईल व तो व्यवस्थित चालेल या बाबत अनेकजण साशंक होते. प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटांना व अडचणींचा सामना करुन अखेर अंबासाखर कारखाना सुरळीत सुरु झाला आहे. आर्थिक वर्ष २०१७-२०१८ चा गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर अल्पावधीत अंबासाखरने आज तारखेपर्यंत १ लाख मे.टन ऊसाचे गाळप केले आहे.अंबासाखर निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करुन चेअरमन रमेश आडसकर यांनी शेतक-यांच्या मालकीचा हा प्रकल्प काटकसरीने चालवत शेतक-यांचे हित साधले आहे. कुठल्याही वित्तीय संस्थेचे व बँकेचे सहकार्य न घेता अंबासाखर चालू केला आहे. यावर्षीच्या गळीत हंगामात चाळीस दिवसात अंबासाखरने १ लाख मे. टन ऊसाचे गाळप केले आहे.तसेच १५ डिसेंबरपर्यंत कारखान्याकडे आलेल्या उसाचे बील प्रतिटन २१०० रुपयप्रमाणे शेतक-यांना अदा केले आहेत. त्याबद्दल चेअरमन रमेश आडसकर व संचालक मंडळाच्या कामाबद्दल ऊस उत्पादक शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.कारखाना यशस्वीरित्या चालविण्यासाठी आडसकर यांना उपाध्यक्ष हणमंतराव मोरे, अंबाजोगाई पिपल्स बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, प्रा. वसंत चव्हाण, दाजीसाहेब लोमटे, अनंतराव पाटील, जनार्दन माने, वसंतराव हारे,शिवराम कदम, अजय ढगे पाटील, बब्रुवान खुळे, औंदुबर शिंदे, तानाजी देशमुख, तुळशीराम राऊत, श्रीराम मुंडे, सुनिल शिंदे, निवृत्ती चेवले, अॅड. प्रमोद जाधव, मारोती साळुंके, अशोक गायकवाड, सुमनबाई चौधरी, पुनम नांदवटे, विभागप्रमुख सुरेश साखरे, एम. डी. सोनवणे, यु. बी. माळी, जी. एम. चव्हाण, आर. आर. देशमुख, कर्मचारी, शेतकी विभाग, मुकादम, ऊसतोड मजुरांचे सहकार्य मिळत आहे.शेतकरी, कर्मचारी व संचालकांचे सहकार्यदिवंगत लोकनेते बाबुराव आडसकर यांनी शेतक-यांच्या हिताची व मालकीची ही संस्था जपण्यासाठी व तिच्या विकासासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. त्यांच्याच विचाराने विद्यमान संचालक काम करीत आहेत. आर्थिक वर्ष २०१७-१८ चा गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर अल्पावधीत अंबासाखरने १ लाख मे.टन ऊसाचे गाळप केल्याचे चेअरमन रमेश आडसकर म्हणाले.
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे बंदनंतर विक्रमी गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:42 IST
मराठवाड्यात सर्वात जुना व कार्यक्षेत्राने मोठा असलेला साखर कारखाना म्हणून अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. मागील ५ वर्ष बंद असलेला कारखाना सुरु होईल व तो व्यवस्थित चालेल या बाबत अनेकजण साशंक होते. प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटांना व अडचणींचा सामना करुन अखेर अंबासाखर कारखाना सुरळीत सुरु झाला आहे. आर्थिक वर्ष २०१७-२०१८ चा गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर अल्पावधीत अंबासाखरने आज तारखेपर्यंत १ लाख मे.टन ऊसाचे गाळप केले आहे.
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे बंदनंतर विक्रमी गाळप
ठळक मुद्देप्रतिकुलतेवर मात : ४० दिवसांत १ लाख मे. टन उसाचे गाळप, टनामागे २१०० चे बील