गेवराई : केवळ निवडणुकीसाठी पक्ष संघटना मजबूत लागते, असे नाही तर समाजकारण करतानासुध्दा पक्ष संघटनेची आवश्यकता भासते. कोरोनाच्या कठीण संक्रमण काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. पक्ष संघटना मजबूत करताना स्वतःची काळजी घ्या, स्वतःसह इतरांचेही लसीकरण करून घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले.
गेवराई विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांनी आढावा बैठक घेतली. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विजयसिंह पंडित यांनी लक्ष घातल्याचे चित्र गेवराई मतदार संघात दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा मराठवाड्यात सुरू आहे. बीड जिल्ह्यातील यात्रेचा प्रस्तावित दौरा रद्द झाला असला तरीही विजयसिंह पंडित यांनी यानिमित्ताने गेवराई विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेल व फ्रंटचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्याशी आढावा बैठकीच्या माध्यमातून संवाद साधला.
यावेळी व्यासपीठावर भाऊसाहेब नाटकर, बाबुराव जाधव, जगन पाटील काळे, जगन्नाथ शिंदे, कुमार ढाकणे, फुलचंद बोरकर, जालिंदर पिसाळ, सुनील पाटील, अब्दुल हन्नान, मोनिका खरात, विलास सोनवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात बैठक आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आपल्या तालुक्यात येणार असून, त्यादृष्टीने सर्वांनी शिस्तबध्द नियोजन केले पाहिजे, असे सांगून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात सुनील पाटील, फुलचंद बोरकर, गजानन काळे, भाऊसाहेब माखले, राजेंद्र बरकसे, अॅड. स्वप्नील येवले आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा युवकचे उपाध्यक्ष शेख सलीम यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्य अहवाल सादर केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडे यांनी केले, तर मोनिका खरात यांनी आभार मानले.
010721\01bed_6_01072021_14.jpg