परळी / बीड : परळी शहरात वडसावित्री नगर रोडवरील मलिकपुरा येथे सोमवारी पहाटे कंटेनरमधून गुटखा उतरवला जात होता. त्याचवेळी शहर पोलिसांनी छापा टाकून हा गुटखा पकडला. गुटख्याची अंदाजे किंमत २६ लाख व वाहनाची किंमत १० लाख रुपये असा ३५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक राहुल धस शहर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस, पोलीस उपनिरीक्षक चांदमेंडके, पोलीस जमादार बाबासाहेब बांगर, पोलीस नाईक सुंदर केंद्रे, माधव तोटेवाड, पो.कॉ. शंकर बुडे यांनी केली.शहरातील वडसावित्री नगर रोडवर मलिकपुरा येथे कंटनेरमधून (क्र. एमएच १४ इ एम९७७३ ) काही लोक पांढऱ्या रंगाच्या गुटख्याच्या बॅग उतरवत असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्याठिकाणी पोलिसांनी अचानकपणे छापा टाकला. पोलीस आल्याचे पाहताच संबंधित लोकांनी अंधाराचा फायदा घेवून गल्ली बोळातून धूम ठोकली. पळून गेलेल्यांचा पोलिसांनी शोध घेतला परंतु, ते सापडले नाहीत. कंटेनर चालकास नाव विचारले असता व्यंकटी लक्ष्मण फड (रा. उखळी ता. गंगाखेड) असे असल्याचे सांगितले. कंटेनर चालकाची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यावेळी हा गुटखा सोलापूर येथून भरल्याची माहिती दिली. त्यानंतर सर्व गुटख्याच्या गोण्या कंटनेरमध्ये टाकून ते शहर ठाण्यात लावले आहे. याची माहिती अन्न भेसळ अधिकारी बीड यांना कळविली. अन्न सुरक्षा अधिकारी ऋषीकेश मरेवार, अनिकेत भिसे यांच्या फिर्यादीवरुन वाहन मालक पंडीत जैद निवृत्ती, चालक व्यकंटी लक्ष्मण फड व त्याच्या सांगण्यावरुन गुटखा मालक रौफ लाला शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धर्मापुरी येथे पकडली होती गुटख्याची तीन वाहनेगत आठवड्यात बुधवारी परळी तालुक्यातील धर्मापुरी रोडजवळ अवैधरित्या गुटखा वाहून नेणाºया ३ वाहनांवर कारवाई केली होती. याप्रकरणात देखील सोमवारी अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादीवरुन परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हा गुटखा कोणाचा आहे हे अद्याप समजले नसल्यामुळे वाहन मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोज १० लाखांची उलाढालजिल्हाभरात गुटखा सर्रासपणे विकला जातो. याविक्रीतून परळी शहरात रोज १० लाख रुपयांची उलाढाल करण्यात होते.गुटखा बंदी कायदा करण्यात आलेला असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री असल्याचे दिसून येत होते. हिच बाब लक्षात घेऊन पोलिसांकडून गुटख्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे.मागील आठवड्यातच एक मोठी कारवाई केली होती. त्यामुळे सर्वसामान्यांमधून पोलिसांच्या कारवायांचे कौतुक केले जात आहे. गुटख्याप्रमाणेच इतर अवैध धंदे देखील बंद करावेत, अशी मागणी देखील नागिरकांमधून होत आहे.
२६ लाखांच्या गुटख्यासह वाहन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:59 IST
परळी / बीड : परळी शहरात वडसावित्री नगर रोडवरील मलिकपुरा येथे सोमवारी पहाटे कंटेनरमधून गुटखा उतरवला जात होता. त्याचवेळी ...
२६ लाखांच्या गुटख्यासह वाहन जप्त
ठळक मुद्देकंटेनर शहर ठाण्यात : धर्मापुरी प्रकरणात ३ वाहन मालकांवर देखील गुन्हे दाखल