शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 07:14 IST

Santosh Deshmukh Latest News: प्रथमतः कराड याच्या दोषमुक्तीसाठीच्या अर्जावर वकील एम. केज टी. यादव यांनी जवळपास दोन तास युक्तिवाद केला.

बीड : तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याने मकोका गुन्ह्यातून दोषमुक्तीसाठी दाखल केलेल्या अर्जावर मंगळवारी जिल्हा न्यायालयात जवळपास ३ तास सुनावणी झाली. न्या. व्यंकटेश पाटवदकर यांनी निकाल राखून ठेवत पुढील सुनावणी ७ जुलै रोजी ठेवली आहे.

प्रथमतः कराड याच्या दोषमुक्तीसाठीच्या अर्जावर वकील एम. केज टी. यादव यांनी जवळपास दोन तास युक्तिवाद केला. त्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ५० मिनिटे युक्तिवाद करत बाजू मांडली. आरोपी कराड याच्या वकिलांनी काही केसेसचा संदर्भ न्यायालयास दिला.

सुनावणीनंतर अॅड. यादव म्हणाले की, चार्जशिट एकत्रित करण्याबाबत न्यायालय निर्णय घेईल, आज फक्त दोषमुक्ती अर्जावर चर्चा झाली.

पुरेसे पुरावे उपलब्ध

पडद्यामागचा सूत्रधार हा वाल्मीक कराडच आहे. आवादाला दोन कोटी रुपये मागण्यात आले होते. या प्रकरणातील व्हिडीओ रेकॉर्डिंगसह पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. 

८ ऑक्टोबर २०२४ रोजी कराड याने २ कोटी रुपये मागितले होते. सुदर्शन घुले हा गँग लीडर आहे, मात्र पडद्यामागे त्याचा सूत्रधार हा कराडच आहे. 

सदरील प्रकरणाचा तपास पोलिस अधिकाऱ्यांनी नव्हे तर तज्ज्ञ सीआयडीने, डीआयजी रँक असलेल्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला.

वाल्मीक कराड याच्याविरुद्ध आमच्याकडे काय काय पुरावे आहेत त्याची जंत्री न्यायालयासमोर सादर केली. कटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या कठपुतळ्यांच्या मार्फत तो दुष्कृत्य करत असतो. -उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील

कराड हेच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे सरकारी पक्षाच्या वतीने सांगितले जात आहे. परंतु, त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर पुरावा नाही. -अॅड. एम. टी. यादव, कराडचे वकील

टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडCourtन्यायालय