शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

६३९४ पथकांमार्फत गोवर, रुबेलाचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:35 IST

गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत बीड जिल्ह्यात ६३९४ पथके नेमण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बालमृत्यू आणि गर्भवती मातांचा मृत्यू रोखण्यासाठी राज्यभरात सुरु असलेल्या गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत बीड जिल्ह्यात ६३९४ पथके नेमण्यात आली आहेत. २७ नोव्हेंबरपासून जिल्हाभरात महिनाभर लसीकरण करण्यात येणार आहे.९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ७ लाख ३० हजार २४० लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. या मोहिमेसाठी ५३५ लस टोचक नियुक्त केले असून, २२७ पर्यवेक्षक म्हणून काम पाहणार आहेत. जिल्ह्यातील ३९६५ शाळांमधून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर ३००४ अंगणवाड्यातील बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. २८९० अंगणवाडी कार्यकर्ती, १९१९ आशा कर्मचारी या मोहिमेत सहभागी होणार आहेत.लसीकरणापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये म्हणून ५७ जोखीमग्रस्त भाग शोधण्यात आले आहेत. येथील लाभार्थ्यांचे जवळच्या रुग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करणार आहेत.गोवर - रुबेला लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, शिक्षण विभाग, बाल रोग तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था एकत्रित प्रयत्न करीत आहेत.गोवर : हा विषाणूद्वारे पसरणारा प्राणघातक आजार आहे. गोवरमुळे बालकांना गुंतागुंत होऊन त्यांचा अकाली मृत्यू होऊ शकतो. गोवर संसर्गजन्य रोग असून, संसर्ग झालेल्या व्यक्तीचे खोकणे, शिंकणे याद्वारे पसरतो. चेहऱ्यावर आणि अंगावर उठलेले गुलाबी लालसर पुरळ, ताप, खोकला, वाहणारे नाक, लालसर झालेले डोळे ही गोवरची लक्षणे आहेत. ५ वर्षांच्या खालील आणि २० वर्षांच्या पुढील प्रौढांसाठी गोवर हा रोग प्राणघातक असू शकतो. कारण या रोगामुळे उद्भवणाºया अतिसार, न्योमोनिया आणि मेंदूसंसर्ग यासारख्या गुंतागुंतीमुळे मृत्यू होऊ ाकतो.रुबेला : सामान्यत: बालकामध्ये हा रोग सौम्य स्वरुपात असतो. पुरळ, हलका ताप, मळमळणे, सौम्य स्वरुपाचा नेत्रदाह ही रुबेलाची लक्षणे आहेत. कानाच्या मागील आणि मानेतील सुजलेल्या लसिका ग्रंथी हे या रोगाचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण वैद्यकीय लक्षण आहे. संसर्ग झालेली प्रौढ व्यक्ती, विशेषत: महिलांना संधीवात, सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. या विषाणूचा संसर्ग मुलगा अथवा मुली दोघांनाही होऊ शकतो.

टॅग्स :Healthआरोग्यgovernment schemeसरकारी योजना