शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

जिल्हा परिषद शाळेत उदमांजराने दिला पाच पिलांना जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 06:49 IST

शिरूर कासार तालुक्यातील केतुरा येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी दुपारी पाच पिलांसह उदमांजर आढळल्याने खळबळ उडाली आहे. पिलांसह या उदमांजराला सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात हलविण्यात आले असून तिथेच त्यांची काळजी घेतली जात आहे.

 बीड -  शिरूर कासार तालुक्यातील केतुरा येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी दुपारी पाच पिलांसह उदमांजर आढळल्याने खळबळ उडाली आहे. पिलांसह या उदमांजराला सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात हलविण्यात आले असून तिथेच त्यांची काळजी घेतली जात आहे. वन्यजीवांच्या अधिवासावर माणसांनी अतिकृमण केल्याने आणखी काय काय पाायला मिळणार आहे, असा सवाल वन्यजीवप्रेमींमधून उपस्थित केला जात आहे.गुरुवारी दुपारी तीन वाजता केतुरा येथील जि.प. माध्यमिक शाळेच्या संगणक कक्षाच्या माळ्यावर उदमांजर आणि तिची पाच पिले असल्याची माहिती येथील अरुण रहाडे व शाळेचे मुख्याध्यापक संतोष पडुळे यांनी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड सँक्च्युअरी असोसिएशनचे अध्यक्ष, वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे यांना भ्रमणध्वनीवरून कळवली. विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ सोनवणे व वन कर्मचारी शिवाजी आघाव घटनास्थळी दाखल झाले.उदमांजर व नवजात पिले पाहिल्यानंतर, या सर्वांना १५-२० दिवसांसाठी येथेच राहू द्या. ते काहीही करीत नाही. ते दिवसभर झोपून रहतात व रात्री भक्ष्याच्या शोधत बाहेर पडतात, असा विश्वास सिद्धार्थ सोनवणे यांनी शिक्षकांना दिला, मात्र त्यानंतरही विद्यार्थी भितात, उदमांजरास तुम्ही घेऊन जा, अशी विनंती शिक्षकांनी केली. त्यामुळे सोनवणे यांनी उदमांजराला पिलांसह विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात संगोपनासाठी आणले. या उदमांजर व पिलांची देखभाल सृष्टी सोनवणे या करीत आहेत. या पिल्लांनी अजून डोळे उघडलेले नाहीत.उदमांजरांचा अधिवास संकटातउदमांजराचा अधिवास हा जुनाट मोठ्या जिवंत व मृत झाडाच्या फांदीवर, झाडाच्या ढोलीमध्ये किंवा डोंगर खडकाच्या, विहिरीच्या कपारीत असतो. याच ढोलीत, तसेच कपारीमध्ये उदमांजरे आपल्या पिलांना जन्म देत असतात. जुनी व मोठमोठी झाडे तोडल्याने, डोंगर कपारीचे उत्त्खनन केल्याने आणि विहिरींना सिमेंट कठडे केल्याने त्यांचा नैसर्गिक अधिवास कमी होत चालला आहे. त्यामुळे हे प्राणी मानवस्तीच्या आश्रयाला येतात व त्यातून असे प्रकार घडत असल्याचे वन्यजीव अभ्यास सिद्धार्थ सोनवणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Beedबीडnewsबातम्या