शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

UPSC Results : 'शंभरी नंबरी' सोनं; दहावीत १०० टक्के मिळवणारा अंबाजोगाईचा वैभव झाला आयएएस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 16:37 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अंबाजोगाईच्या वैभव वाघमारेचे यश

ठळक मुद्देदेशात 771 वा रँक प्राप्त केलीदुसऱ्या प्रयत्नात मिळवले यश कुठलीही खाजगी शिकवणी न लावता मिळवले यश

अंबाजोगाई : येथील भूमिपुत्र वैभव विकास वाघमारे याने केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी), दिल्ली यांच्या वतीने सप्टेंबर-2019 मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत देशातून 771 वी रँक प्राप्त करत उज्ज्वल यश संपादन केले आहे. दहावीत १०० टक्के पटकावलेल्या वैभवच्या यशाचा आलेख कायम चढाच राहिला आहे. विशेष म्हणजे त्याने हे यश कुठलीही खाजगी शिकवणी न लावता मिळवले आहे.

वैभवचे आई-वडील आशा व विकास हे शिक्षक आहेत. तालुक्यातील नांदडी हे वाघमारे यांचे मुळ गाव आहे. वैभवचे आजोबा ईश्वर वाघमारे व आजी भिमाबाई वाघमारे हे दोघेही शेतमजूर होते. स्वतः अशिक्षित असूनही त्यांनी वैभवचे वडील विकास वाघमारे यांना शिक्षक केले. विकास वाघमारे हे सध्या लातूर येथील शंभूलिंग शिवाचार्य माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. तर आशाताई वाघमारे (गवळी) या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. 

दहावीत घेतले होते १०० टक्के वैभवने योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मंदिर विभागातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले. तर माध्यमिक शिक्षण हे देशी केंद्र लातुर येथून पूर्ण केले. दहावीला असताना वैभवने शंभर टक्के गुण प्राप्त केले होते. शाहू महाविद्यालय, लातूर येथे अकरावी ते बारावीचे शिक्षण पूर्ण केले. बारावीला असताना वैभवने 87 टक्के गुण घेतले होते. 

दुसऱ्या प्रयत्नात मिळवले यश पुणे येथे सी.ओ.ई.पी. महाविद्यालयातून त्याने मेकॅनिकल शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करत इंजिनिअरची पदवी प्राप्त केली. त्यानंतर 2018 साली लोकसेवा आयोगाची पहिली परीक्षा दिली यावेळी त्याला यशाने हुलकावणी दिली. मात्र, सप्टेंबर-2019 साली केवळ दुस-याच प्रयत्नात त्याने हे यश प्राप्त केले. वैभवने देशातून 771 वी रँक प्राप्त केली असून तो आएएएस झाला आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.

सेल्फ स्टडी करा निकाल अपेक्षित होता, पेपर सोपे गेले होते. त्यातच मुलाखतिला सुद्धा आत्मविश्वासाने सामोरे गेलो होते. या संपूर्ण तयारीत आई-वडील यांना खूप बळ दिले. यासोबतच मित्रांच्या भक्कम साथी शिवाय हे यश अशक्य होते. मी तयारी करताना कोणतीही शिकवणी लावली नव्हती. वेळोवेळी ऑनलाईन उपलब्ध साहित्याचा अभ्यास केला. तयारी करणाऱ्या सर्वाना एकच सांगणे आहे कि, खाजगी शिकवणीच्या मागे न लागता सेल्फ स्टडीवर भर द्या. - वैभव वाघमारे, आएएस, 771 वी रँक

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगBeedबीडAmbajogaiअंबाजोगाई