शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची सभा संपेपर्यंत बीडचे शिवसेना जिल्हा प्रमुख पोलिसांच्या नजरकैदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 18:52 IST

मंंगळवारी रात्रीपासूनच त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

बीड : नगर पालिकेने उभारलेल्या मल्टीपर्पज मैदानाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिलेले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत घोषणा करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी दिला होता. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि मंंगळवारी रात्रीपासूनच त्यांना नजरकैदेत ठेवले. तर मुख्यमंत्र्यांनी क्षीरसागरांचे ऐकून मैदानाच्या नावाबद्दल घोषणा केली नसल्याचा आरोप मुळूक यांनी केला आहे.

मागील काही दिवसांपासून क्रीडांगणाच्या नावावरून वाद सुरू झाले आहेत. क्रीडांगणाच्या कमानीवर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण असे नावही टाकले होते. हे नाव काढण्यासाठी प्रशासन गेले असता चार दिवसांपूर्वी याबाबत काही संघंटना, पक्षांनी एकत्र येत आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासन माघारी परतले. बुधवारी मुख्यमंत्री येणार असल्याने शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी याबाबत अधिकृत घोषणा करण्याची मागणी केली होती. त्यांनी तसे पत्रकही काढले होते. मात्र मंगळवारी रात्रीपासूनच त्यांना प्रशासनाने नजरकैदेत ठेवले. सभा संपेपर्यंत त्यांच्यावर ही नजर कायम होती.

दरम्यान, शिवसेनेचे सुशिल पिंगळे, संजय महाद्वारसह अनेक कार्यकर्ते नगर पालिकेत मुख्यमंत्री असताना तेथे गेले आणि नावाची घोषणा करा, अशी विनंती करणारे निवेदन दिले. मात्र मुख्यमंत्र्यांनी सभा संपेपर्यंत याबाबत काहीच घोषणा केली नाही. 

प्रशासनाने धोका दिला - सचिन मुळूकक्रीडांगणाला नाव देण्याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र त्यांनी धोका दिला. याबाबत कसलीच घोषणा झाली नाही. मुख्यमंत्र्यांनाही याबाबत कल्पना दिली होती. मात्र ते क्षीरसागर बंधुंचे ऐकून याबाबत काहीच बोलले नाहीत. प्रशासनाने आम्हाला धोका दिला आहे. मात्र आम्ही शांत बसणार नाहीत. पुढे काय करायचे? याबाबत वेळेनुसार भूमिका ठरवू, अशा प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी दिली.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBeedबीडChief Ministerमुख्यमंत्रीPoliceपोलिस