शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

महिला तलाठ्यासोबत हुज्जत, सातबाराचे रजिस्टर फाडले; एकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 14:01 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयाचा दरवाजा पुढे करून सोशल‌ ‌डिस्टन्सिंग‌चे नियम पाळून तलाठ्यांचे कामकाज सुरु होते.

अंबाजोगाई : सोशल‌ ‌डिस्टन्सिंग‌मुळे कार्यालयात येण्यास मज्जाव केल्याच्या रागातून एकाने महिला तलाठ्याशी हुज्जत घालून त्यांच्या हातातील सातबाराचे रजिस्टर फाडून टाकले. ही घटना अंबाजोगाई शहरात मंगळवारी दुपारी घडली. 

 माया प्रभू चव्हाण या साकुड सजाच्या तलाठी आहेत. मंगळवारी अंबाजोगाईच आठवडी बाजार असल्याने ग्रामीण भागातून अनेक लोक येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी लागणारे कागदपत्रे, फेरफार नकला, सात बारा, ८-अ इ. देण्यासाठी त्या अंबाजोगाईतील प्रशांत नगर कार्यालयात थांबल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयाचा दरवाजा पुढे करून सोशल‌ ‌डिस्टन्सिंग‌चे नियम पाळून त्यांचे कामकाज सुरु होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास मांडवा पठाण येथील बाबासाहेब बळीराम जोगदंड हा शेतकरी त्यांच्या कार्यालयात आला. मला तुम्ही कार्यालयात का येऊ देत नाहीत असे म्हणत त्याने जबरदस्तीने आत प्रवेश केला. 

मांडवा पठाण गावचा गट दाखवा म्हणत चव्हाण यांच्या हातातील गट रजिस्टर हिसकावून घेत त्याचे दोन तुकडे केले. चव्हाण यांच्याशी अर्वाच्च भाषा वापरत ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी माया चव्हाण यांच्या फिर्यादीवरून बाबासाहेब बळीराम जोगदंडवर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक संदीप दहिफळे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडPoliceपोलिस