शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
2
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
3
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
4
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
5
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
6
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
7
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
8
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
9
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
10
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
11
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
12
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'
13
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
14
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
15
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
16
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
17
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
18
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय
19
राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
20
'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्

अंधारात अंदाज न आल्याने दुचाकी ट्रॉलीवर धडकली, दोघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 5:13 PM

केज-कळंब राष्ट्रीय महामार्गावर झाला अपघात

- मधुकर सिरसटकेज: केज-कळंब राष्ट्रीय महामार्गावरील सुर्डी शिवारात उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून दुचाकी धडकल्याची घटना गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. पांडूरंग भिमराव भालेकर (वय 43 रा. तांदूळवाडी ता कळंब) व विठ्ठल उत्तम कस्पटे (वय 40 रा. इटकूर ता कळंब) अशी मृतांची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पांडुरंग भालेकर आणि विठ्ठल कस्पटे हे दोघे नात्याने मेव्हणे आहेत. गुरुवारी दुपारी दोघेही कामानिमित्त केज तालुक्यात आले होते. रात्रीच्या सुमारास एकाच दुचाकीवरून दोघेही कळंब मार्गे आपल्या गावी परतत होते. दरम्यान, सुर्डी फाट्याजवळ ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या वेगाचा अंधारात अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी ट्रॉलीला पाठीमागून धडकली. धडक जोरदार असल्याने दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक ट्रॅक्टर घेऊन फरार झाला. माहिती मिळताच युसुफवडगाव पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोनि योगेश उबाळे आणि जमादार खेडकर यांनी अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला. 

टॅग्स :AccidentअपघातBeedबीड