शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

विना मावेजा वेठबिगारी; मध्यप्रदेशातील 35 मजुरांची एनजीओने पोलिसांच्या मदतीने केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 17:41 IST

३५ मजुरांसह त्यांची मुले अशा ५६ जणांची सुटका करण्यात आली. 

ठळक मुद्दे एनजीओची गेवराई पोलिसांच्या मदतीने कारवाई मजुरांना मध्यप्रदेशात परत जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून देण्यात आली आहे.

गेवराई (जि. बीड) : तालुक्यातील गोंदी येथे कामासाठी आणून वेठबिगारी कराव्या लागणाऱ्या मध्य प्रदेशातील ३५ मजुरांची मुलाबाळांसह सुटका करण्यात आली. मध्यप्रदेशातील एका एनजीओने तेथील पोलिसांसह गेवराई तहसील प्रशासन, पोलिसांच्या मदतीने ही कारवाई  केली. 

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असून मध्यप्रदेशातील ३५ मजुरांना येथील एका मुकादमाने गेवराई तालुक्यातील गोंदी खुर्द येथील एका शेतकऱ्याच्या शेतात आणून त्यांच्याकडून वेठबिगारी करुन घेत होता. या मजुरांना काम सुरू झाल्यानंतर तुमच्या कामाचा मावेजा दिला जाईल म्हणून सांगितले होते, मात्र त्यांना कुठलाही मावेजा न देता वेठबिगारी करुन घेतली जात होती. याबाबत एका मजुराने तक्रार केल्यानंतर मध्यप्रदेशातील एका एनजीओने तेथील पोलिसांना सोबत घेऊन गेवराई गाठली.

गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांना सर्व हकीकत सांगून त्यांना सोबत घेतले व  गोंदी गाठून या ३५ मजुरांसह त्यांची मुले अशा ५६ जणांची सुटका करण्यात आली. पोहोचलेल्या महसूल व पोलीस यंत्रणेने घटनास्थळी पंचनामा करुन मजुरांचे जबाब घेतले. त्यानंतर या मजुरांची गेवराई शहरातील कमलाकर देशमुख यांनी त्यांच्या तथास्तू मंगल कार्यालयात राहण्याची सोय केली.  तहसील प्रशासनाने जेवणाची सोय केली. तलाठी माणिक पांढरे यांनी देखभाल केली. या मजुरांना मध्यप्रदेशात परत जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून देण्यात आली आहे. त्यामुळे मजुरांना मोठा दिलासा मिळाला, त्यांनी  सुटकेचा निःश्वास सोडला. हे मजूर गुरुवारी स्वगृही परततील अशी माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिस