अंबाजोगाई : आधी मोबाईलवरून शिवीगाळ करून त्यानंतर दोन दिवसांनी बारावीची परीक्षा देत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीस अंबाजोगाई शहरातील तरुणाने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्या तरुणावर अॅट्रॉसिटीसह अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, याबाबत पूर्वसूचना देऊनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना घडली असा आरोप मुलीच्या पित्याने केला आहे.सदरील मुलगी अंबाजोगाई तालुक्यातील असून तिचे वडील खाजगी वाहनावर चालक आहेत. तक्रारीत म्हटले की, रविवारी ते वाहनाचे भाडे घेऊन औरंगाबादला गेले होते. त्याच दिवशी दुपारी त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर फोन करून एका व्यक्तीने शिवीगाळ केली. ही बाब पत्नीकडून समजल्यानंतर त्या चालकाने दुसऱ्या दिवशी शोध घेतला असता तो मोबाईल क्रमांक अंबाजोगाई शहरातील वडारवाडा येथील मुस्तफा अलाउद्दीन याचा असल्याचे समजले. त्यांनी मुस्तफाला जाब विचारल्यानंतर त्याने समीर शेख सादेक (रा. वडारवाडा) याने तो फोन केल्याचे सांगितले. त्यानंतर बुधवारी दुपारी १२ वाजता त्यांची मुलगी अंबाजोगाईत महाविद्यालयात काम असल्याचे सांगून घराबाहेर पडली. परंतु महाविद्यालयास सुटी असल्याने पित्याला संशय आला आणि त्यांनी सर्वत्र मुलीचा शोध घेतला परंतु ती सापडली नाही. दरम्यान, समीर शेख सादेक हा त्याच्या घरी नसून तो तुमच्या मुलीस घेऊन गेला आहे असे मुस्तफा याने त्यांना सांगितले. पित्याने समीरच्या घरी जाऊन पहिले असता घर बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर पित्याने थेट अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे गाठून समीरने फूस लावून त्यांच्या मुलीस पळवून नेल्याची तक्रार नोंदविली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करत आहेत.तक्रार नाही घेतलीअनोळखी मोबाईल क्रमांकावरून शिवीगाळ होत असल्याची तक्रार घेऊन अपह्रत मुलीचा पिता ग्रामीण ठाण्यात गेला होता. परंतु, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करत तक्रार नोंदवून घेतली नाही. पोलिसांनी त्याचवेळी लक्ष देऊन चौकशी केली असती तर ही वेळ आली नसती अशी खंत पित्याने व्यक्त केली.
अल्पवयीन विद्यार्थिनीस पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 00:21 IST
आधी मोबाईलवरून शिवीगाळ करून त्यानंतर दोन दिवसांनी बारावीची परीक्षा देत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीस अंबाजोगाई शहरातील तरुणाने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
अल्पवयीन विद्यार्थिनीस पळविले
ठळक मुद्देअॅट्रॉसिटीसह अपहरणाचा गुन्हा : पूर्वसूचनेनंतरही पोलिसांचे दुर्लक्ष