शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

नात्याला काळिमा! प्रेमप्रकरण उघड करण्याची धमकी देत अल्पवयीन पुतणीवर काकाचा अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 16:37 IST

४० वर्षीय चुलत्याने तू तुझ्या मित्रासोबत बोलू नकाे, माझ्यासोबत प्रेम कर, असे म्हटले.

बीड : मित्रासोबत सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाची माहिती आई-वडिलांना देईन, अशी धमकी देत अल्पवयीन पुतणीला काकाने ब्लॅकमेल केले. तब्बल चार वर्षांपासून त्याने तिच्याशी कुकर्म केले. हा धक्कादायक प्रकार तालुक्यातील एका गावात २३ मार्च रोजी उघडकीस आला.

मूळ बीड तालुक्यातील गाव असलेली पीडित मुलगी आई-वडिलांसोबत पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास आहे. तेथे ती सध्या पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेते. २५ एप्रिल २०१८ रोजी शाळेला सुट्या लागल्याने ती गावी आजी - आजोबांकडे आली होती. यावेळी तिच्याकडील मोबाईल घेऊन ४० वर्षीय चुलत्याने तू तुझ्या मित्रासोबत बोलू नकाे, माझ्यासोबत प्रेम कर, असे म्हटले. त्यानंतर २८ एप्रिल २०१८ रोजी त्याने तिच्याशी बळजबरीने कुकर्म केले. कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पुढे पीडिता पुण्याला परत गेल्यावर तेथे येऊन चार ते पाचवेळा जबरदस्तीने अत्याचार केला. डिसेंबर २०२० मध्ये त्याने शेवटचा अत्याचार केला. त्यानंतर पीडितेने घडला प्रकार आईला सांगितला. यावर पीडितेच्या आई-वडिलांनी गावी येऊन त्यास समज दिली. मात्र, त्याने धमकी देत तुमची मुलगी गावी आणून सोडा, अन्यथा तिची बदनामी करून जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या तक्रारीवरून बीड ग्रामीण ठाण्यात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला. तपास पिंक मोबाइल पथकाकडे वर्ग करण्यात आला.

चार दिवसांची पोलीस कोठडी

बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, उपनिरीक्षक देविदास आवारे, पिंक मोबाइल पथकाच्या उपनिरीक्षक मीना तुपे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपीला २३ रोजी रात्रीच अटक केली होती. त्यास २४ रोजी न्यायालयात हजर केले असता २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती उपनिरीक्षक मीना तुपे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड