शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

विस्थापित ३६ पदवीधर शिक्षकांचे अखेर समायोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:30 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्यानंतर रखडलेल्या समायोजन प्रक्रियेला मंगळवारी मुहूर्त मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्यानंतर रखडलेल्या समायोजन प्रक्रियेला मंगळवारी मुहूर्त मिळाला. ३६ प्राथमिक पदवीधर शिक्षकांना समुपदेशन पध्दतीने पदस्थापना देण्यात आली.जिल्ह्यातील १०८० प्राथमिक संवर्गातील शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या झाल्यानंतर विस्थापिक शिक्षकांच्या समायोजनेचा विषय ऐरणीवर होता. त्यानंतर मुख्याध्यापक पदी पदोन्नती तसेच इतर विषयांच्या प्रक्रियेमुळे समायोजन प्रक्रिया लांबत चालली होती. अखेर मंगळवारी (९ जुलै) प्राथमिक पदवीधरांच्या समायोजनेसाठी मंगळवारी पात्र शिक्षकांना बोलवण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात समायोजन प्रक्रिया पार पडली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, जि. प. सदस्य अशोक लोढा, शिक्षणाधिकारी (मा.) भगवान सोनवणे, उपशिक्षणाधिकारी बी. एस. सोनवणे, मोहन काकडे, हिरालाल कराड, विस्तार अधिकारी विठ्ठल राठोड, तुकाराम पवार,सर्व गटशिक्षणाधिकारी, अधीक्षक गिरीश बिजलवाड, संगणक परिचालक अविनाश गजरे, मनोज लोखंडे, सचिन बेदरे, तुषार शेलार, दिलीप पुलेवाड आदी उपस्थित होते. यावेळी पदवीधर विस्थापित १२ महिला शिक्षक आणि २४ शिक्षक अशा ३६ जणांचे समायोजन करण्यात आले.१२ जुलैसाठी याद्या लावल्या२५९ सहशिक्षकांना १२ जुलै रोजी समुपदेशनातून पदस्थापना देण्यात येणार आहे. जिल्हा अंतर्गत बदली २०१९ नुसार प्राथमिक संवर्गातील शिक्षकांच्या संवर्ग १, २ व ४ अन्वये, बदली आॅनलाईनद्वारे पूर्ण झाली. या प्रक्रियेनंतर विस्थापित व २०१८ मधील रॅन्डम राउंडमधील प्राथमिक शिक्षकांना समुपदेशनाद्वारे पदस्थापनेची कार्यवाही जिल्हा स्तरावर होत असून, शिक्षकांची अंतिम ज्येष्ठता यादी बीईओ कार्यालयात डकविण्याचे सूचित केले आहे. गैरहजर शिक्षकांना जिल्हा स्तरावरुन समुपदेशनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या जागा रिक्त राहतील, तेथे संबंधितांची पदस्थापना करण्यात येणार आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदली