शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सुषमा अंधारे यांना मारहाण? ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा दावा, केले गंभीर आरोप

By सोमनाथ खताळ | Updated: May 18, 2023 23:06 IST

महाप्रबोधन यात्रेच्या पूर्वसंध्येलाच राडा

बीड : शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाप्रबोधन यात्रा शनिवारी बीडमध्ये होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सभास्थळाची पाहणी करण्यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी गेले होते. यावेळी दोन जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव व उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यात हाणामारी झाली. तसेच जिल्हाप्रमुखांच्या गाडीची काचही फोडण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद झालेली नाही. दरम्यान, रात्री उशिरा जिल्हाप्रमुख जाधव यांनी आपण अंधारे यांना चापटा मारल्याचाही दावा केला आहे. याप्रकाराने खळबळ उडाली आहे.सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच ठाकरे गटाची बीडमध्ये मोठी सभा होत आहे. या सभेसाठी खा.संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह इतर खासदार, आमदारांची उपस्थिती राहणार आहे. त्याची माहिती जिल्हाप्रमुख अनिल जगताप व अप्पासाहेब जाधव यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी संपर्कप्रमुख धोंडू पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सायंकाळच्या सुमारास अंधारे यांच्यासह जिल्हाप्रमुख जगताप व जाधव हे माने कॉम्प्लेक्स परिसरातील सभास्थळी पाहणी करत होते. याचवेळी जाधव व वरेकर यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जात हाणामारी केली. त्यातील जाधव यांच्या काळ्या रंगाच्या गाडीची काचही फोडली. इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भांडणे सोडविल्यानंतर दोघेही तेथून निघून गेले. या प्रकरणाची रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद झालेली नाही.

जाधव म्हणाले, अंधारेंना दोन चापटा लगावल्या

सभास्थळाची पाहणी करण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्यावेळी अंधारे देखील त्या ठिकाणी होत्या. सध्या सुषमा अंधारे जिल्ह्यात दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये फर्निचर, सोफे, एसी बसविण्यासाठी पैसे मागत आहेत. माझे पण पद विकत आहेत. मी पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतू यावर त्यांचे लक्ष नाही. त्यामुळेच माझे आणि सुषमा अंधारे यांचे झाले आणि म्हणूनच मी त्यांना दोन चापटा लगावल्या, अशी प्रतिक्रिया खूद्द जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी दिली आहे. याबाबत सुषमा अंधारे यांच्याशी उशिरापर्यंत संपर्क न झाल्याने त्यांची बाजू समजली नाही.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBeedबीड