शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

गर्भलिंगनिदान केल्याप्रकरणी डॉक्टरला दोन वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 6:32 PM

२०११ मध्ये दिल्लीच्या समितीने केली होती ढाकणे यांच्या हॉस्पिटलची तपासणी

ठळक मुद्देजिल्हा शल्यचिकित्सक फिर्यादी डॉ. गौरी राठोड आणि किशोर बिरलिंगे हे दोन साक्षीदार तपासण्यात आले.

बीड : गर्भातील बाळाचे लिंगनिदान करणे तसेच केलेल्या सोनोग्राफीचे रेकॉर्ड कायद्याप्रमाणे ठेवले नसल्याचा आरोप सिद्ध झाल्याने येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र नारायणराव ढाकणे यास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील मुख्य न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांच्या न्यायालयाने सुनावली. 

शहरातील सुभाष रोडवर ढाकणे हॉस्पिटल असून तेथील सोनोग्राफी सेंटरला दिल्ली येथील राष्ट्रीय पर्यवेक्षण व मूल्यमापन समितीने ११ आॅक्टोबर २०११ रोजी रोजी भेट दिली होती. समितीच्या पाहणीत त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांना या सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गौरी राठोड यांनी या सोनोग्राफी सेंटरला भेट दिली असता, काही गरोदर महिलांची सोनोग्राफी केलेले निदर्शनास आले. परंतु, या तपासणीसाठी  बंधनकारक अटींची पूर्तता केलेली दिसली नाही. तसेच एका गरोदर महिलेचे सांकेतिक भाषेचे १६ असे गर्भलिंगनिदान केल्याचे पेपर मिळून आले. यावेळी संबंधित महिलेच्या सोनोग्राफीची कागदपत्रे शल्यचिकित्सकांनी मागितली असता, ती देण्यात आली नाहीत. 

जिल्हा शल्यचिकित्सक फिर्यादीजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गौरी राठोड यांनी २० डिसेंबर २०११ रोजी बीड येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणात डॉ. गौरी राठोड आणि किशोर बिरलिंगे हे दोन साक्षीदार तपासण्यात आले. यात डॉ. राठोड यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने डॉ. राजेंद्र ढाकणे यांना दोषी धरुन दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता एस. बी. कदम यांनी काम पाहिले.  संबंधित दोषीविरुद्ध पुढील कारवाईसाठी शल्यचिकित्सकांना राज्य वैद्यकीय परिषदेकडे अहवाल पाठविण्यासाठी सदर निकालाची प्रत देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.  

टॅग्स :Womenमहिलाdoctorडॉक्टरBeedबीडCourtन्यायालय