शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिलांची कमाल, शेतकरी कंगाल; गोडगोड थापांना भुलून १४ लाखांना फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 14:15 IST

लिंबू प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करून तक्रारदाराने संबंधिताला दिले होते, अशी प्राथमिक माहिती आहे.

परळी (जि. बीड) : केंद्र सरकारमार्फत लिंबू प्रक्रिया उद्योग सुरू करून ९० टक्के अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून तालुक्यातील सारडगाव येथील एकाची १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ८ मार्च रोजी नाशिक येथील दोन महिलांवर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

प्रदीप शत्रुघ्न तांदळे (३६, रा.सारडगाव), असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तुमच्या संस्थेस भारत सरकारच्या लघु, सूक्ष्म व मोठ्या कर्ज योजनेंतर्गत ९० टक्के अनुदानावर लिंबू प्रक्रिया उद्योग सुरू करून देतो, असे आमिष दाखविले. त्यानंतर सारडगाव येथे येऊन पाहणी केली. यादरम्यान त्यांच्याकडून तब्बल १४ लाख ५ हजार रुपये उकळले व नंतर प्रक्रिया उद्योगाला मंजुरी मिळाली ना अनुदान आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर प्रदीप तांदळे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यावरून मनीषा देवीदास तंवर, स्मिता पांडुरंग बोडके (दोघी रा.नाशिक) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. तपास सपोनि विशाल शहाणे करीत आहेत.

म्हणे अधिकाऱ्यांना द्यावे लागतात९० टक्के अनुदानाची योजना मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात, असे सांगितले गेले. त्या दोघींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फोन-पे वर प्रदीप तांदळे यांनी १४ लाख ५ हजार रुपये पाठविले.

व्याप्ती मोठीलिंबू प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करून तक्रारदाराने संबंधिताला दिले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. फसवणुकीचा आकडा आणखी वाढू शकतो. त्यामुळे प्रकरणाची व्याप्ती अधिक असण्याची शक्यता आहे. तपास सुरू आहे.- विशाल शहाणे, सहायक निरीक्षक, परळी ग्रामीण ठाणे 

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी