शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वनपालाला धक्काबुक्की, माजी उपनगराध्यक्षासह दोघांना दोन वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 17:39 IST

सरकार पक्षातर्फे सहा तर बचाव पक्षाकडून दोन साक्षीदार तपासण्यात आले.

बीड : येथील विभागीय वनाधिकारी कार्यालयाच्या गाळ्याची भिंत तोडून वनपालास धक्काबुक्की केल्याप्रकरणी माजी उपनगराध्यक्ष व काकू- नाना आघाडीचे पालिकेतील विद्यमान गटनेते फारुक अली सय्यद मसरत अली ऊर्फ फारुक पटेल व जाकीरुद्दीन युसूफुद्दीन सिद्दीकी(दोघे रा.शहेंशाहनगर, बीड) यांना दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्या. हेमंत महाजन यांनी २० डिसेंबर रोजी हा निकाल दिला.

शहरातील खासबाग परिसरात विभागीय वनाधिकारी कार्यालयाची इमारत आहे. मुख्य रस्त्यावर कार्यालयाने गाळे बांधलेले आहेत. दरम्यान, ही जागा वनविभागाच्या मालकीची असतानाही २२ जुलै २०१५ रोजी सकाळी साडेनऊ वाजता गाळ्याचे कुलूप तोडून मागील बाजूची भिंत तोडण्यात आली. यावेळी तत्कालीन विभागीय वनाधिकारी आर.आर.काळे यांनी वनपाल सखाराम प्रल्हाद कदम यांना भिंत तोडणाऱ्यांना रोखण्याचे फर्मान सोडले. त्यानुसार कदम हे तेथे गेले, त्यांना समजावत असताना तेेथे माजी उपनगराध्यक्ष फारुक पटेल आले. त्यांनी ‘तुम दिवार तोडना जारी रखो, वह कौन कदम है..?' असे म्हणत अंगावर धावून आले. यावेळी त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. चिथावणीमुळे भिंत तोडून अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले.दरम्यान, वनपाल सखाराम कदम यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करुन मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी सय्यद फारुक पटेल व जाकीरुद्दीन युसूफुद्दीन सिद्दीकी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला. हवालदार अशाेक सोनवणे यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्या. हेमंत महाजन यांच्यासमोर सुनावणी झाली. सहायक सरकारी वकील अजय तांदळे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. साक्षीपुरावे व त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्या. हेमंत महाजन यांनी दोघांनाही दोषी ठरवले. कलम ३३२ प्रमाणे दोन वर्षे कारावास व एक हजार रुपये दंड, कलम ३५३, ५०४, ५०६ प्रमाणे एक वर्षे कारावास व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत. ॲड. अजय तांदळे यांना ॲड.पी.एन.मस्कर यांनी सहाय्य केले.

सहा साक्षीदार तपासलेसरकार पक्षातर्फे सहा तर बचाव पक्षाकडून दोन साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, तपास अधिकारी, पंच साक्षीदार यांचे जबाब व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने त्या दोघांना शिक्षा ठोठावली.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी