शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये बिंदुसरा नदीवर होणार दोन नवे पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:32 IST

बीड : नव्या बीड शहरातून जुन्या बीड शहराला जोडणारे बिंदुसरा नदीवर दोन नवीन पूल बनविण्यात येणार आहेत. या संदर्भात पालिकेने पर्यटन विकास मंडळाकडे प्रस्ताव पाठविले आहेत. तसेच काळा हनुमान ठाणा ते खंडेश्वरी मंदिर या दरम्यान सिमेंट क्राँकिटचा रस्ता बनविला जाणार आहे. तिन्ही कामांचा मिळून पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविल्याचे ...

बीड : नव्या बीड शहरातून जुन्या बीड शहराला जोडणारे बिंदुसरा नदीवर दोन नवीन पूल बनविण्यात येणार आहेत. या संदर्भात पालिकेने पर्यटन विकास मंडळाकडे प्रस्ताव पाठविले आहेत. तसेच काळा हनुमान ठाणा ते खंडेश्वरी मंदिर या दरम्यान सिमेंट क्राँकिटचा रस्ता बनविला जाणार आहे. तिन्ही कामांचा मिळून पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविल्याचे पालिका सूत्रांकडून समजते.

जुना बाजार ते कनकालेश्वर मंदिराला जोडणारा दगडी पूल हा निजामकालीन आहे. पूर आल्यानंतर या दगडी पुलावरुन पाणी वाहते. त्यामुळे रस्ता बंद होतो. परिणामी वाहतूक वळवावी लागते. याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. हाच धागा पकडून या ठिकाणी १.८५ लाख रुपये खर्चून ५० मीटर लांब, ७.५ मीटर रुंद व २० फूट उंच नवा पूल बनविला जाणार आहे. तसेच मोमीनपुरा ते खासबागला जोडण्यासाठी बिंदुसरा नदीवर १.३५ लाख रूपये खर्चून नवा पूल तयार केला जात आहे. या पुलाची उंचीही २० फूट असणार आहे.

तसेच पेठ बीड भागातील काळा हनुमान ठाणा ते खंडेश्वरी मंदिर असा ८०० मीटर लांब, ८ मीटर रुंद सिमेंट काँक्रिटचा रस्ता बनविला जाणार आहे. यासाठी १.८० लाख रुपये निधीचा प्रस्ताव तयार केला आहे. हे तिन्ही प्रस्ताव नगर पालिकेने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पर्यटन विकास मंडळाकडे एप्रिल महिन्यात पाठविले आहेत. दीपावलीपर्यंत या पाच कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळेल, असा दावा पालिकेने केला आहे. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर, बांधकाम अभियंता किरण देशमुख यांनी हा प्रस्ताव तयार केला आहे.

मंत्रालयातून झाला पत्रव्यवहारसाधारण मार्च महिन्यात पर्यटन मंत्र्यांकडून बीड नगरपालिकेला प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात एक पत्र आले. त्याप्रमाणे पालिकेत बैठक घेऊन दोन नवीन पूल व एक नवीन रस्ता तयार करण्यासंदर्भातचा प्रस्ताव तयार करुन पाठविण्यात आला. या कामांना मंजुरी मिळून लवकरात लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा बीडकरांना आहे.

टॅग्स :BeedबीडBindusara Damबिंदुसरा धरणMarathwadaमराठवाडाroad transportरस्ते वाहतूक