शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात कर्जास कंटाळून दोन शेतकऱ्यांनी संपविली जीवयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 18:54 IST

कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

बीड/पाटोदा : कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी जीनयात्रा संपविल्याच्या घटना बीड जिल्ह्यात घडल्या. याप्रकरणी संबंधीत पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

मच्छिंद्र ज्ञानोबा वीर (४० रा. पाटोदा) या शेतकऱ्यास केवळ दोन एकर जमीन आहे. नेहमीच्या दुष्काळी परिस्थितीला तोंड देताना शेतीसह आधार म्हणून हमाली करण्याचा व्यवसाय ते करत होते. काही दिवसांपूर्वी पत्नीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी उसनवारी करत मोठ्या मुलीचे लग्न केले. लहरी निसर्गाने धोका दिल्याने शेतात पिके आली नाहीत, त्यामुळे केलेली उसनवारी आणि कर्ज फिटले नाही. गुरुवारी बाजार असल्याने हमालीमधून चांगले पैसे मिळतील या आशेने ते बाजारात गेले. मात्र केवळ १०० रूपये मिळाले. अशा परिस्थितीत दुसऱ्या मुलीचे लग्न कसे करायचे, याची चिंता त्यांना होती. याच नैराश्यातून त्यांनी गळफास घेत गुरूवारी सायंकाळी जीवनयात्रा संपविली. लखन वीर यांच्या खबरीवरून पाटोदा ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. 

दुसरी घटना बीड तालुक्यातील सुर्डीथोट येथे घडली.  युवराज अभिमन्यू थोटे (२८ रा.सुडीर्थोट ता.बीड) या तरूण शेतकऱ्यास चार एकर जमीन आहे. घरात आई-वडिल,पत्नी आणि एक भाऊ असा परिवार आहे. युवराज यांनी शेतीसाठी गावातील सेवा सोसायटीकडून दीड लाख, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वडवणी शाखेतून २५ हजाराचे कर्ज घेतले होते. दुष्काळामुळे शेतीतून उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे युवराज हा नैराश्यात होता. गुरुवारी सायंकाळी तो शेतात गेला होता. त्या ठिकाणी त्याने विषारी द्रव प्राशन केले. हा प्रकार चुलत भाऊ कैलास थोटे यांना कळाल्यानंतर त्यांनी व काही ग्रामस्थांनी तातडीने शेतात धाव घेवून युवराजला बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणी करुन त्यास मयत घोषीत केले. दरम्यान कैलास थोटे यांच्या खबरेवरुन जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीत याप्रकरणी नोंद करण्यात आली.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याBeedबीड