शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

आरोपीचा लॉकअपमध्ये ‘फिनेल’ पिण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:58 IST

माजलगाव : महाविद्यालयातील एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला मनोज फुलवरे या आरोपीने सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान ठाण्यातील लॉकअपमध्येच फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर पुन्हा त्याची लॉकअपमध्ये रवानगी केली. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.शहरातील एका महाविद्यालयातील ...

माजलगाव : महाविद्यालयातील एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला मनोज फुलवरे या आरोपीने सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान ठाण्यातील लॉकअपमध्येच फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर पुन्हा त्याची लॉकअपमध्ये रवानगी केली. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

शहरातील एका महाविद्यालयातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पाच जणांविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील मुख्य आरोपी आशिष बोरासह मनोज फुलवरे, प्रमोद कदम यांच्यासह एका अल्पवयीन युवतीला ताब्यात घेतले होते. सोमवारी आशिष व मनोज यांना न्यायालयात हजर केले जाणार होते.

तत्पूर्वीच मनोजने शौचालयातील फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. प्रकृती ठणठणीत झाल्यावर त्याला पुन्हा लॉकअपमध्ये नेले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही २७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान, डॉक्टरांनी रेफर लेटर दिल्यावरही पोलिसांनी आरोपीला रेफर न करता न्यायालयात हजर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रेफर लेटर दिल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद कुलकर्णी यांनी दिली. पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन म्हणाले, तसा प्रयत्न केला होता परंतु हा प्रकार एवढा काही गंभीर नाही. आम्ही त्याला न्यायालयात हजर केले होते.

पळवाटा काढण्याचा प्रयत्नअत्याचार प्रकरणात अनेक राजकीय लोकांचा संबंध असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताब्यातील आरोपीने पोलिसांच्या चौकशीपासून बचावासाठी हा प्रयत्न केल्याची चर्चा माजलगावात होती. याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. मात्र लवकरच या प्रकरणाचा छडा लावू, असा विश्वास माजलगाव पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गंभीर प्रकरणात हस्तक्षेप ?हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. परंतु काही राजकीय व इतर क्षेत्रातील लोकांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पोलीस तपासाला अडचणी ठरत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके म्हणाल्या, हस्तक्षेपाबद्दल मी काहीच बोलणार नाही. लवकरच प्रकरणाचा रिझल्ट पहायला मिळेल. कोणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई करू. पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही नवटके यांनी केले.

टॅग्स :BeedबीडCrimeगुन्हाMarathwadaमराठवाडा