शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी महिलेचे १५ तोळे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:27 IST

भूसावळ येथून परळीकडे निघालेल्या वृध्द प्रवासी महिलेच्या बॅगमधील १५ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास केले. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता बीड बसस्थानकात घडली. दरम्यान दागिने चोरीला गेल्याचे समजताच महिलेने हा प्रकार चालक-वाहकांना कळवला. त्यानंतर बस तात्काळ शिवाजीनगर ठाण्यासमोर उभी केली.

ठळक मुद्देबीड स्थानकात थांबलेल्या बसमध्ये भरदुपारी घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : भूसावळ येथून परळीकडे निघालेल्या वृध्द प्रवासी महिलेच्या बॅगमधील १५ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास केले. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता बीड बसस्थानकात घडली. दरम्यान दागिने चोरीला गेल्याचे समजताच महिलेने हा प्रकार चालक-वाहकांना कळवला. त्यानंतर बस तात्काळ शिवाजीनगर ठाण्यासमोर उभी केली.लता देविदास महाजन (वय ६२, रा. टीपीएस कॉलनी, परळी) असे प्रवासी महिलेचे नाव आहे. शनिवारी सकाळी त्या भुसावळ येथील भावाला भेटून मुलाच्या गावी परळीकडे एकट्याच येत होत्या. दुपारी ३ वा. सुमारास त्या भुसावळ-परळी या बसमधून (एमएच १४ बीटी २५२१) बीड स्थानकात पोहचल्या. त्यावेळी दागिने ठेवलेल्या बॅगची त्यांनी पाहणी केली होती. दरम्यान, दहा मिनिटांसासाठी बस येथे थांबली होती. प्रवासी महाजन यांनी बसमध्येच जेवण केले. याचवेळी केव्हातरी अज्ञात चोरट्यांनी बॅगमधील सोन्याचे दागिने चोरुन नेले. थोडा वेळानंतर स्थानकातून बस बाहेर पडत असताना त्यांना दागिने गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ वाहकास हा प्रकार सांगितला. गांभीर्य ओळखून चालकाने बस थेट शिवाजीनगर ठाण्यासमोर आणून उभी केली. इतर प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पुढे पाठवण्यात आले. महिलेच्या तक्रारीवरुन अज्ञाताविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, महिलेने घडलेला प्रकार कथन करताच शिवाजीनगर पोलीस कर्मचाºयांनी बसस्थानक परिसरात जाऊन पाहणी केली. सीसीटिव्ही फुटेजही तपासले. या प्रकरणी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

टॅग्स :BeedबीडGoldसोनंtheftचोरी