बीड : जन्माने मुलगा असूनही अंगात खेळणाऱ्या स्त्रीत्वाच्या भावना, समाजाचे टोमणे आणि गरिबीशी दोन हात करीत परभणीच्या आकांक्षा पौळ या तृतीयपंथी तरूणीने बीडच्यापोलिस भरती मैदानात झेप घेतली आहे. कधीकाळी भिक्षा मागून आणि बारमध्ये काम करून स्वतःच्या शस्त्रक्रिया पूर्ण करणाऱ्या आकांक्षाला आता खाकी वर्दी परिधान करून पोलिस दलात मानाने जगायचे आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
आकांक्षा मूळची परभणीची. लहानपणापासूनच शरीरातील बदलांमुळे तिला विसंगती जाणवू लागली. समाजाने तिला स्वीकारले नाही, म्हणून ती घराबाहेर पडली. २०१४ साली भिक्षा मागून जमा केलेल्या पैशांतून तिने मुंबईत पहिली शस्त्रक्रिया केली. त्यानंतर परिस्थितीशी झुंज देत २०१६ मध्ये छातीची शस्त्रक्रिया पूर्ण केली. मुंबईतील बारमध्ये काम करून तिने स्वतःचे अस्तित्व घडविण्याचा प्रयत्न केला; मात्र, बार बंद झाल्याने तिला पुन्हा संघर्षाला सामोरे जावे लागले.
सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीरस्त्यावर किंवा मठात राहताना तिला नेहमी पोलिस कर्मचारी दिसायचे. तिथूनच तिला वर्दीचे आकर्षण निर्माण झाले. २०२३ मध्ये तृतीयपंथीयांना पोलिस भरतीत संधी मिळाल्यावर तिने मुंबईत प्रयत्न केला; मात्र, थोड्या गुणांनी यश हुकले. हार न मानता तिने पुणे महापालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम केले आणि त्यानंतर जळगावच्या ‘दीपस्तंभ मनोबल’ संस्थेत राहून दीड वर्षापासून एमपीएससीचा अभ्यास सुरू केला.
बीडच्या मैदानात घाम गाळतेय आकांक्षापोलिस भरतीची जाहिरात निघताच आकांक्षाने बीड जिल्ह्यातून महिला प्रवर्गातून अर्ज भरला. बुधवारी बीड पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर ती वर्दीसाठी धावली. गोळाफेक आणि धावण्यात तरबेज असलेल्या आकांक्षाचा आत्मविश्वास दांडगा आहे. “समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी मला पोलिस बनायचे आहे,” असे ती जिद्दीने सांगते. तिचा हा खडतर प्रवास आज भरतीसाठी आलेल्या हजारो उमेदवारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
लोक ‘बायल्या’ म्हणायचे...लहानपणापासून गावात राहताना हावभाव आणि चालण्या-बोलण्यावरून लोक तिला ‘बायल्या’ म्हणून चिडवत असत. कोणी मुलगा तर कोणी मुलगी म्हणायचे, ज्यामुळे तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. अखेर या भेदभावाला कंटाळून तिने घर सोडले आणि काहीतरी बनून दाखविण्याची जिद्द बाळगली. आज कुटुंबापासून दूर राहून ही तृतीयपंथी तरुणी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मैदानात घाम गाळत आहे.
ललिता ते ललित; बीडमध्येही एक उदाहरणबीड पोलिस दलात ललिता साळवे यांचे उदाहरण राज्यासाठी दिशादर्शक ठरले होते. दिसायला महिला मात्र भावना पुरुषाच्या असल्याने त्यांनी परवानगी घेऊन शस्त्रक्रिया केली. ललिताची ‘ललित साळवे’ होऊन बीड पोलिस दलात सेवा सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा केला होता. हे प्रकरण राज्यभर गाजले असून, सध्या ललित यांचा सुखी संसार सुरू आहे, त्यांना एक अपत्यही आहे.
आरक्षण द्यावे तृतीयपंथी असल्याने कोणीही नोकरी, जॉब देत नाही. त्यामुळे संघर्ष करावा लागतो. नोकरभरती करताना एक टक्का आरक्षण देणे गरजेचे आहे. यातून तरी आम्हाला हक्काचं घर मिळेल.- आकांक्षा पौळ
Web Summary : Akanksha Paul, a transgender woman, battled poverty and societal prejudice to pursue her dream of becoming a police officer in Beed, inspired by Lalit Salve's journey.
Web Summary : आकांक्षा पॉल, एक किन्नर महिला, ने ललित साल्वे की यात्रा से प्रेरित होकर, बीड में पुलिस अधिकारी बनने के अपने सपने को पूरा करने के लिए गरीबी और सामाजिक पूर्वाग्रह से लड़ाई लड़ी।