शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बीड पंचायत समितीत सत्ताबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:04 IST

पंचायत समितीमध्ये दुसऱ्या टर्ममध्ये सत्ताबदल झाला आहे. असून, आ. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सभपतीपदी सारीका बळीराम गवते व उपसभापती शिवसेनेचे मकरंद उबाळे यांची वर्णी लागली आहे. यावेळी ११ विरुद्ध ५ असे मतदान झाले.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सारिका गवते सभापती, तर शिवसेनेचे मकरंद उबाळे उपसभापती

बीड : पंचायत समितीमध्ये दुसऱ्या टर्ममध्ये सत्ताबदल झाला आहे. असून, आ. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सभपतीपदी सारीका बळीराम गवते व उपसभापती शिवसेनेचे मकरंद उबाळे यांची वर्णी लागली आहे. यावेळी ११ विरुद्ध ५ असे मतदान झाले.सभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या सारीका बळीराम गवते व उपसभापती पदासाठी मकरंद उबाळे हे रिंगणात होते. तर, शिवसेनेकडून सभापती पदासाठी मनिषा खांडे तर उपसभापती पदासाठी बबन माने हे उमेदवार समोर उभे होते. यावेळी १६ सदस्यांपैकी काकू-नाना विकास आघाडी (राष्ट्रवादी) ५, शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २, भाजप १, शिवसंग्राम १ असे ११ मते आघडीच्या उमेदवार सारीका बळीराम गवते व मकरंद उबाळे यांना मिळाले. त्यामुळे त्यांचा विजय झाला.या विजयामुळे अडीच वर्षापुर्वी सदस्य सर्वांधिक असताना देखील हातची गेलेली पंचायतसमितीची सत्ता पुन्हा क्षीरसागर यांनी आपल्याकडे खेचत आ. विनायक मेटे व मा.मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना राजकीय धक्का दिला आहे.दरम्यान सभापती व उपसभापती पदाच्या निवडीच्या काही दिवसांपुर्वी फुटलेल्या सदस्यांना व्हीप काढण्याची तयारी शिवसेना व शिवसंग्रामने केली होती. तसे त्यांनी व्हीप देखील काढला परंतु, गटनेते मकरंद उबाळे असल्यामुळे त्यांच व्हीप ग्राह्य धरत मतदानप्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे मागील काही दिवसा व्हीप नाट्या पंचायतसमिती सभापती उपसभपती निवडीत रंगले होते. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आ. संदीप क्षीरसारगर यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत केले. यावेळी मा.आ. सुनिल धांडे, बबन गवते, बळीराम गवते यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सोयीच्या राजकारणातून पंचायत समित्यांवर ताबाजिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत परळी, अंबाजोगाई, धारुर, माजलगाव, वडवणी आणि बीड येथे राष्टÑवादी कॉँग्रेसने बाजी मारली. केज, गेवराई, आष्टी पंचायत समित्यांमध्ये भाजपचा सभापती झाला. राज्यात सत्तांतर झाले असलेतरी स्थानिक पातळीवर सर्वच पक्षाच्या सदस्यांनी एक दुसºयाला मदत केल्याचे पहायला मिळाले. गेवराईत शिवसेनेने भाजपला मदत केली तर धारुरमध्ये भाजपने राष्टÑवादीला मदत केली. माजलगाव, परळी, वडवणीमध्ये राष्टÑवादीने आपले गट अभेद्य ठेवले. केजमध्ये मात्र हक्क असताना डावलल्याने भाजपच्या सदस्याने विरोधात मतदान करत राग व्यक्त केला. पाटोदा येथे मंगळवारी निवडणूक होणार आहे.

टॅग्स :Beedबीडpanchayat samitiपंचायत समितीElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना