शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! ३ लाखांच्या खंडणीसाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण; १४ तासांत आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 11:55 IST

सिनेस्टाईल पद्धतीने आरोपीच्या आवळल्या मुसक्या; आष्टी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

कडा(जि.बीड) - तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून २५ रोजी अपहरण केल्याची घटना घडली होती. आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तपासाची चक्रे फिरवत अवघ्या १४ तासांत रविवारी दुपारी तीनच्या दरम्यान भिगवण येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीच्या सिनेस्टाईल पध्दतीने कारवाई करणाऱ्या आष्टी पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आष्टी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे २५ मार्चच्या रात्री अज्ञात कारणांसाठी अपहरण झाले होते. मुलीच्या वडिलांना ३ लाखांच्या खंडणीसाठी वारंवार वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन आले होते. आष्टी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तांत्रिक माहितीच्या आधारे थेट भिगवण गाठले. रविवारी दुपारी आष्टी पोलिसांनी सापळा रचला. आम्ही पैसे घेऊन भिगवण-इंदापूर रोडवर उभा असल्याचे सांगितले. आरोपी पैसे घ्यायला येताच त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर तेथील एका हाॅटेलमधील खोलीत कोंडून ठेवलेल्या मुलीची सुखरूप सुटका करत वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. अवघ्या १४ तासांच्या आत सिनेस्टाईल पध्दतीने आष्टी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी भिगवण येथील आकाश बंडगर (२६) याला ताब्यात घेतले आहे. आज आरोपीला  न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे, पोलिस नाईक प्रवीण क्षीरसागर, पोलिस अंमलदार शिवप्रकाश तवले, पोलिस नाईक विकास जाधव, महिला पोलिस हवालदार स्वाती मुंडे, पोलिस अंमलदार सचिन कोळेकर यांनी  केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडKidnappingअपहरण