शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

तेलगावमध्ये १० दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 23:38 IST

तेलगाव येथे धारूर रोड परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या स्व.तात्यासाहेब अण्णा लगड व्यापारी संकुलातील तब्बल १० दुकानात बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडले आहेत.

ठळक मुद्देचोरांचा धुमाकूळ : व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; बीडमध्ये शिक्षकाचे घर फोडले

बीड : तेलगाव येथे धारूर रोड परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या स्व.तात्यासाहेब अण्णा लगड व्यापारी संकुलातील तब्बल १० दुकानात बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडले आहेत. यावेळी दुकानातील लाखों रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या चोरीमुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.तेलगाव (ता. धारूर) या गावातून ५४८ सी हा राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे. या राष्ट्रीय महामार्गालगतच स्व.तात्यासाहेब अण्णा लगड व्यापारी संकुल असून या व्यापारी संकुलात ३० दुकाने आहेत. या संकुलात बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकाने फोडून चोरी केल्याची घटना घडली आहे. एकाच रांगेत असेलेल्या १० दुकानाच्या छतावरील पत्रे उपसून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला व दुकानातील विविध वस्तुंसह रोख रक्कमांवर डल्ला मारला. यात गोरख राठोड यांच्या दुकानातून ९० हजार रुपये किंमतीचा कॅमेरा चोरला. दत्ता मोरे यांच्या श्रीराम पान मटेरियल मधील रोख २० हजार रुपये व इतर सामान असे मिळून ७० हजार रुपये लंपास केले. गोविंद तिडके यांच्या इलेक्ट्रॉनिक मधील २ एलईडी टी.व्ही. सह इतर साहित्य. शेख तन्वीर यांच्या सहारा आॅटोमोबाईल्स मधील आॅईल व इतर सामान, अण्णासाहेब काळे यांच्या जनरल स्टोअर्समधील खेळणी साहित्य, अण्णासाहेब तिडके यांच्या आॅनलाईन सर्व्हिस मधील ३५ हजाराचे लॅपटॉप, बापुराव धुमाळ यांच्या इलेक्ट्रीकल्स मधील रोख ६ हजार रुपये. तर मुंजा शेळके यांच्या किराणा दुकानातील रोख दीड लाख रुपये या चोरट्यांनी लंपास केले आहेत. याप्रकरणी दिंद्रूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गस्त वाढवण्याची मागणीसदरील घटनेमुळे व्याºयासह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून दिद्रुड पोलिसांकडून होत असलेल्या बेपरवाईमुळेच ही घटना घडल्याचे नागरिकांमधून सांगण्यात आले. रात्री गस्त घालणे बंधनकारक असताना देखील अनेक वेळा पोलिसांकडून गस्त घातली जात नाही अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. तात्काळ चोरांना अटक करावी व गस्त वाढवावी अशी मागणी देखील यावेळी नागरिकांनी केली आहे.चोरट्यांनी मारला बिर्याणी हाऊसमध्ये तावया परिसरात असलेल्या एका बिर्याणी हाऊसमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला होता. यावेळी त्याठिकाणी ठेवलेल्या अंड्यावर चोरट्यांनी ताव मारला. तसेच सामान अस्ताव्यस्त फेकून दिल्याचे बिर्याणी चालकाने सांगितले.तसेच एका जनरल स्टोअर्समधून डोक्याला लावण्याच्या तेलाच्या बाटल्या देखील चोरांनी लंपास केल्या.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस