शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘आयपीएल’वर सट्टा घेणारे तिघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:10 IST

आॅपरेशन आॅलआउट दरम्यान नाकाबंदी करताना अंबाजोगाई शहर पोलिसांच्या पथकाने आयपीएलच्या सामन्यासाठी सट्टा घेणाऱ्या तीन सट्टेबाजांना ताब्यात घेतले.

अंबाजोगाई : आॅपरेशन आॅलआउट दरम्यान नाकाबंदी करताना अंबाजोगाई शहर पोलिसांच्या पथकाने आयपीएलच्या सामन्यासाठी सट्टा घेणाऱ्या तीन सट्टेबाजांना ताब्यात घेतले. तिघांवरही गुन्हा दाखल करत त्यांच्याकडून मोबाईल, दुचाकीसह ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.शनिवारी मध्यरात्री आॅपरेशन आॅलआउट दरम्यान अंबाजोगाई शहर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भुजबळ, सहा. फौजदार बिडगर, पो.ना. येलमाटे, कुंडगीर हे नाकाबंदी करत होते. यावेळी दुचाकीवरून (एमएच ४४ एम ९३७७) प्रमोद सिद्रामअप्पा पोखरकर, श्रीनिवास बाळासाहेब पंडित आणि गजानन गुलाबराव यादव हे तिघे तरुण संशयास्पद अवस्थेत बसस्थानकाकडून भगवानबाबा चौकात येत असलेले त्यांना दिसून आले. पोलिसांनी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता डिक्कीमध्ये वही आढळून आली. त्यात आकडे, पैसे आणि आयपीएल सामन्याबाबत माहिती होती. पोलिसांनी चौकशी केली असता शनिवारी झालेल्या आयपीएल सामन्यात कोणता खेळाडू किती धावा काढणार, किती बळी घेणार यावर घेतलेल्या सट्ट्याचा हिशोब असल्याचे सांगितले. पोलिसांनी मोबाईल, रोख रक्कम आणि मोटारसायकल असा एकूण ७५ हजार ५०० मुद्देमाल जप्त केला. पोलीस कर्मचारी कुंडगीर यांच्या फिर्यादीवरून तिन्ही तरुणांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :BeedबीडIPL 2019आयपीएल 2019Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीPoliceपोलिस