शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

परळीत विक्रीसाठी आणलेली तीन गावठी पिस्तुल, ७ काडतूस जप्त; दोन युवक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 18:45 IST

चांदापुर रस्त्यावर पोलिसांनी केली कारवाई

परळी( बीड) : शहरातील चांदापूर रस्त्यावर आज दुपारी पोलीस कारवाईत दोघांकडून ३ गावठी पिस्तुले व ७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही युवकांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. 

याबाबतची पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ,येथील चांदापुर रस्त्यावर दोघे जण गावठी पिस्तूल घेऊन थांबले असल्याची माहिती अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाये यांना मिळाली. त्यांनी तत्काळ परळी शहर पोलीस ठाण्यास सूचना केली. यावरून जमादार भास्कर केंद्रे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 

यावेळी संशियत दोघांची झडती घेतली असता एका जवळील बॅगेत दोन गावठी पिस्तुल व सात काडतुसे तर दुसऱ्या जवळ एक गावठी पिस्तुल आढळून आले. मनोज भरत गीते ( हाळम तालुका परळी)  व नागनाथ देवनाथ फड ( रा. ऊखळी तालुका गंगाखेड )  अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान, परळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव  सपकाळ ,पोलिस जमादार भास्कर केंद्रे , तुकाराम मुरकुटे गोविंद भताने ,श्रीकांत राठोड ,गोरे ,राजकुमार मुंडे याच्या कारवाईत गेल्या काही दिवसात सहा गावठी पिस्तूल जप्त करण्यात अली आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड