शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले ६ जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 01:14 IST

नामलगाव फाट्याजवळून ५ जानेवारी रोजी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ६ जणांना पोलिसांनी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहराजवळील नामलगाव फाट्याजवळून ५ जानेवारी रोजी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ६ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख सपोनि गजानन जाधव व त्यांचे सहकारी रविवारी पोट्रोलिंग करत होते. त्यावेळी नामलगाव फाट्याजवळ असलेल्या उड्डानपुलाच्या खाली काहीजण महामार्गावर गाड्या अडवून लुटमार करत दरोडा टाकण्याच्या तयारी होते. अशी महिती खबऱ्यामार्फत दरोडाप्रतिबंधक पथकाला मिळाली होती. याप्रकरणाची माहिती जाधव यांनी पोलीस नियंत्रण ५ जानेवारी रोजी १० वाजण्याच्या सुमरास कक्षास दिली व उड्डानपुलाजवळ गेले.यावेळी त्यांना पाहताच दरोडेखोरांनी त्याची चारचाकी (एमएच ०४ डीवाय ६७९३) घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते पळून जात असताना सपोनि जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी गाडीसह ६ दरोडेखोरांना अटक केली.दरम्यान त्यांना अटक केली त्यावेळी विचारपूस केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच खरे नावं सागितली व हे दरोड्याच्या तयारीत होते हे देखील निष्पन्न झाले. यावेळी अटक करण्यात आलेले शरद श्रीरंग जाधव (रा. वाघलखेडा, ता. अंबड जि.जालना), नाथा लाला गायकवाड (रा. शास्त्रीनगर, पेठ बीड), दिपक मारोती जाधव (रा. गजानन नगर पेठ बीड), बप्पाराव जाधव (शास्त्रीनगर पेठ बीड), किरण अशोक नकवाल (रा. माऊलीनगर पेठ बीड ) , पठाण शाहरूख पठाण हमीद (रा. शहेंशाहनगर बीड वाहन चालक) असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. त्यांच्याकडून चारचाकी गाडी, दरोडा टाकण्यासाठी एक लोखंडी थोटी कट्यार, एक लोखंडी सळई, रोख रक्कम व मोबाईल असे एकूण ५ लाख ५६ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जप्त केलेला मुद्देमाल देखील पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडाप्रतिबंधक पथक प्रमुख सपोनि गजानन जाधव, सफौ आवारे, सौदंरमल पोह. नागरगोजे, पोना. वाघ, शिंदे, जोगदंड यांनी केली. याप्रकरणाचा पुढील तपास बीड ग्रामीण ठाण्याचे सपोनि योगेश उबाळे हे करत आहेत.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीDacoityदरोडा