शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

केजजवळ कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात तिघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 20:11 IST

नांदूर फाटा ते सांगवी सारणी दरम्यान असलेल्या सारुळ पाटीवर अपघात

ठळक मुद्देमयतात एक माजी सैनिक तर दोन शेतकऱ्यांचा समावेश अपघातात दुचाकीचा चकनाचूर झाला आहे

केज : केज-बीड रोडवरील नांदूर फाटा ते सांगवी सारणी दरम्यान असलेल्या सारुळ पाटीवर दुपारी ३ वाजेच्या दरम्यान एक कार व मोटारसायकलच्या भीषण अपघातात तिघे ठार झाले आहेत. यात एक माजी सैनिक आणि दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे.

दुपारी ३ वाजेच्या सुमारास नांदूर फाटा ते सांगवी सारणी रोडवर कल्याणहून रेणापूरकडे जाणारी कार (एमएच-०४/ जीएम२८९ ) आणि दुचाकीमध्ये (एमएच ४४ डी ६६९२) भीषण अपघात  झाला. यात सारुळ येथील रहिवासी असलेले दुचाकीवरील आप्पाराव बापूराव ढाकणे ( ८० ) जागीच ठार झाले. तर माजी सैनिक सुंदर नामदेव ढाकणे ( ५३ ) आणि बहादूर राजाभाऊ पुरी ( ४८ ) यांचा उपचारासाठी अंबाजोगाई येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. 

हा अपघात एवढा गंभीर होता की, अपघातात दुचाकीचा चकनाचूर झाला आहे. कार सुद्धा अपघातस्थळापासून दोनशे मीटर अंतरावर जाऊन रस्त्याच्याकडेला खड्ड्यात उलटली आहे. कारमधील प्रवासी किरकोळ जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच प्रभारी सहाय्यक निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, पोलीस कर्मचारी गुंजाळ, चालक हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडDeathमृत्यू