माजलगाव : घरगुती गॅस सिलिंडरच्या भडका होऊन स्फोटात तीन घरे जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील मोगरा येथे शिवाजी नगर तांडा येथे गुरुवारी दुपारी अडीच वाजता घडली. गॅस सिलिंडरने पेट घेतल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. या आगीत प्रकाश पवार , अशोक पवार ,विकास पवार यांची घरे खाक झाली अून मोठे आर्थिक नुकसान झाले. सुदैवाने यात कसल्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोहचोल्या माजलगाव नगर परिषोच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तहसील कार्यालयाकडून घराचे पंचनामे करण्यात आले.दरम्यान या आगीत तिन्ही भावाची घरे व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
माजलगाव तालुक्यातील मोगरा येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटात आग लागून ती घरांचे मोठे
नुकसान झाले.
===Photopath===
250221\purusttam karva_img-20210225-wa0037_14.jpg~250221\purusttam karva_img-20210225-wa0036_14.jpg