शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

हजारो भाविकांनी घेतले योगेश्वरी देवीच्या पालखीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 15:56 IST

महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या सिमोल्लंघनासाठी निघालेल्या भव्य पालखी सोहळ्याने नवरात्र महोत्सवाची सांगता झाली.

अंबाजोगाई (बीड) : महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या सिमोल्लंघनासाठी निघालेल्या भव्य पालखी सोहळ्याने नवरात्र महोत्सवाची सांगता झाली. शहर व परिसरातील हजारो भाविकांनी देवीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवानिमित्त गुरुवारी दुपारी योगेश्वरी देवी मंदिरात विधीवत महापुजेनेनंतर पालखी सिमोल्लंघनासाठी निघाली. फटाक्यांची भव्य आतिषबाजी, पारंपारिक वाद्य, ढोलताशांचा गजर व आराधी भाविकांचे भजनी मंडळ यांच्या मेळ्यात पालखीचे मार्गक्रमण झाले. शहरात ठिकठिकाणी पालखीचे दर्शन घेण्यासाठी महिला व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पालखीसोबत आराध्यांचा मोठा ताफा  सहभागी झाला होता.

भजनी मंडळे, आराध्यांची गीते, सनई, चौघाडाच्या  गजरात पालखी शहरातून निघाली. शहरवासियांनी ठिकठिकाणी पालखीचे जंगी स्वागत केले.दारासमोर सडा, रांगोळ्या,देवीचे औक्षण, खणा-नाराळाने महिला भाविकभक्तांनी ठिकठिकाणी स्वागत केले. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने योगेश्वरी मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पालखी सोबत असणा-या आराधी महिलांना स्व. प्रेमचंदजी कुंकुलोळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी चार हजार महिलांना फराळाचे वाटप करण्यात आले. 

यावेळी ट्रस्टचे संयोजक उद्योगपती रसिक कुंकुलोळ, संतोष कुंकुलोळ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आराधी महिला व भाविकांना फराळांचे वाटप करण्यात आले.  यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, माजी आ. पृथ्वीराज साठे, अक्षय मुंदडा, नमिता मुंदडा, गिरीधारीलाल भराडिया  व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविवारपेठ मित्र मंडळाचे आनंद टाकळकर, राहुल पेडगावकर, सतीश दहातोंडे, किरण सेलमोहकर, बाळा पाथरकर, संदेश जोशी,  प्रशांत सेलमोहकर,  सचिन भातलवंडे, सतीश कुलथे,  बाळासाहेब पाथरकर, महेश नाईक, प्रतिक दहातोंडे, वरद दहातोंडे, सुनिल मुथा, वरद मुडेगांवकर यांच्यासह भाविक भक्त व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :BeedबीडDasaraदसराAmbajogaiअंबाजोगाई