शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या अक्षम्य हयगयीमुळेच ही घटना घडली, त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे: धनंजय देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 12:03 IST

भावाला जसे तडफडून मारले, तसेच या सर्वांना फाशीचीच शिक्षा व्हावी; फोटो व्हायरलनंतर धनंजय देशमुख धायमोकलून रडले

बीड/केज : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे आणि अंगावर शहारे आणणारे काही कथित फोटो सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी सकाळीच मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांना जरांगे पाटील पाहताच अश्रू अनावर झाले. जवळ येताच गळ्यात पडून ते धायमोकलून रडले. आई रोज पाहतेय... तिच्याकडे जायची हिंमत होत नाहीये.. असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली, तसेच आता आरोपींना फाशीच व्हायला हवी, तेव्हाच न्याय मिळेल, अशी अपेक्षाही धनंजय यांनी व्यक्त केली.

धनंजय मुंडेंना सहआरोपी करासरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातधनंजय मुंडेंवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात येऊन त्यांची आमदारकीसुद्धा रद्द करावी. या प्रकरणाचा पुरवणी तपास करण्यात यावा व यात धनंजय मुंडेंना सहआरोपी करावे.- मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक

मदत करणाऱ्यांना सहआरोपी कराया घटनेतील सर्व मारेकऱ्यांसह त्यांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांना सहआरोपी करून त्यांना पण फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. या घटनेत पोलिस यंत्रणा, प्रशासन दोषी आहे. ज्यांनी कोणी तपासात अडथळे आणले, पळून जायला मदत केली, त्या सर्वांचा सहआरोपीत समावेश करावा. पोलिस यंत्रणेकडे हे फोटो अडीच महिन्यांपूर्वी आले आहेत. त्याचवेळी हे उघड झाले असते तर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला वेळ लागला नसता. त्यांना कोणी अभय दिले. हेही पाहिले पाहिजे.- बजरंग सोनवणे, खासदार, बीड

पोलिसांनाही शिक्षा व्हावीदोन वर्षांपासून यातील आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना पोलिसांच्या नाकावर टिच्चून हे आरोपी राजरोस पोलिसांसोबत फिरत होते. अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली त्याचवेळी या आरोपींच्या मुसक्या आवळल्या असत्या तर ही घटना घडतच नव्हती. पोलिसांनी आरोपीचे लोकेशन तत्काळ घेतले असते तरी आरोपी लवकर सापडले असते. माझ्या भावाचा जीव वाचला असता. पोलिसांच्या अक्षम्य हयगयीमुळेच ही घटना घडली असून, त्यांनाही याची शिक्षा झाली पाहिजे. भावाला जसे तडफडून मारले, तसेच या सर्वांना फाशीचीच शिक्षा व्हावी ही आपली इच्छा आहे.- धनंजय देशमुख, संतोष देशमुख यांचे भाऊ

टॅग्स :Beedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडेSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरण