शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

तिसऱ्या श्रावण सोमवारी शिव-गणेश भक्तीचा योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 11:42 PM

हर हर महादेव, शिवशंभो महाराज की जय या जयघोषात तिसºया श्रावणी सोमवारी जिल्ह्यातील शिवमंदिरे गजबजली.

ठळक मुद्देहर हर महादेवचा गजर : दुष्काळाचे संकट दूर करण्याचे साकडे

बीड : हर हर महादेव, शिवशंभो महाराज की जय या जयघोषात तिसºया श्रावणी सोमवारी जिल्ह्यातील शिवमंदिरे गजबजली. श्री क्षेत्र परळी येथील प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासह सौताडा येथील रामेश्वर, श्री क्षेत्र कपिलधार, बीड शहराचे ग्रामदैवत कनकालेश्वर मंदिरात भाविकांनी मनोभावे दर्शन घेत हे प्रभू दुष्काळाचे संकट दूर करण्याचे साकडे घातले. तिसरा श्रावणी सोमवार आणि गणेश चतुर्थी असा योग जुळून आल्याने भाविकांनी शिवमंदिरासह गणेश मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.‘कनकालेश्वर महाराज की जय’बीड शहरातील श्री कनकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची रेलचेल सुरु झाली. मंदिरात जाण्यासाठी पुलावर पाणी नसल्याने भाविकांची सुविधा झाली. मंदिर परिसरात विविध दुकाने लागली होती. शेकडो भाविक महिला, पुरुषांनी रांगेत पूजा, अर्चना अभिषेक करुन दर्शन घेतले. यावेळी गाभाºयातून ‘कनकालेश्वर महाराज की जय’ जा गजर ऐकायला मिळत होता. तिसºया सोमवारी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेत पेठ बीड पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त तैनात होता.बीड शहरातील सोमेश्वर, नीळकंठेश्वर, जटाशंकर, लोकरेश्वर, बोबडेश्वर, पुत्रेश्वर, मार्कंडेयश्वर तसेच इतर शिवमंदिरात भाविकांनी दर्शन घेतले. शहरालगतच्या शिवदरा, पापनेश्वर व पाली येथील नागनाथ मंदिरातही भाविकांची वर्दळ होती. तसेच चाकरवाडी, गोरक्षनाथ टेकडी, रुद्रेश्वर मंदिरातही भाविकांनी दर्शन घेतले.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रम