शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला ‘दिलासा’ नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:25 IST

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच नापिकी या कारणाला कंटाळून जिल्ह्यातील शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतात. आत्महत्येचा हा आकडा कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र आजघडीला दिसत आहे.

ठळक मुद्देआत्महत्या रोखण्यात प्रशासनासह समाजाचे अपयश : दुष्काळ अन् नापिकी आत्महत्येची प्रमुख कारणे

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच नापिकी या कारणाला कंटाळून जिल्ह्यातील शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतात. आत्महत्येचा हा आकडा कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र आजघडीला दिसत आहे. हे प्रशासनासोबतच समाजाचे अपयश आहे.बीड जिल्हा हा कमी अवर्षणाचा जिल्हा आहे. दर एक वर्षाआड जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असते. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे कायम हाल होतात. पिकांना भाव नसल्यामुळे घेतलेले कर्ज, कौटुंबिक गरजा भागविणे देखील जिकिरीचे होते. याच विवंचेनतून जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण प्रत्येक वर्षात वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील सहा वर्षांमध्ये १२३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी प्रशासनाकडे आहे. यावर्षी डिसेंबर महिन्याच्या आजच्या तारखेपर्यंत २१६ शेतक-यांनी नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हाच आकडा मागील डिसेंबरअखेर १८७ इतका होता. यामध्ये वाढ झाली आहे. ही वाढ चिंतेची बाब असून, शेतकरी वाचला तर देश वाचेल या भावनेतून ही आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासन तसेच समाजातून सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी नेत्यांमधून व्यक्त केले जात आहे.प्रशासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतक-यांना मदत करण्यासाठी मागच्या वर्षी माजी आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या संकल्पनेतून उभारी हा प्रकल्प राबवण्यात आला होता. यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला १ लाख रुपये शासकीय मदतीसह कृषी, महसूल, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह इतर विभागातील योजनांचा लाभ देण्यात येत होते. यासाठी मर्यादित कालावधीची मोहीमही राबवण्यात आली. यावेळी बहुंताश कुटुंबाना त्यांच्या घरी जाऊन अधिकाºयांनी विविध योजनांचे लाभ दिले होते. परंतु भापकर हे सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर प्रशासनाकडून योजनेला ब्रेक लागला. जवळपास एक वर्षापासून या योजनेच्या माध्यमातून एकही लाभ आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबाना दिलेला नाही. पुन्हा अशा प्रकारचा उपक्रम राबवून आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबाना योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.या योजनांचा दिला कमी लाभआत्महत्या शेतकरी कुटुंबियांना आरोग्य योजना, विहीर, शेततळे, शुभमंगल योजना, संजय गांधी निराधार योजना, कर्ज मंजुरी, घरकुल या योजनांचा कमी प्रमाणात लाभ दिल्याचे दिसून येते. जनधन बँक खाते, गॅस जोडणी, अन्नसुरक्षा योजना आदी योजनांचा लाभ मात्र मोठ्या प्रमाणात दिला आहे. शेतकरी कुटुंबियांकडून विविध योजनांची मागणी केली जाते. यावेळी सहानुभूतीपूर्वक अधिकारी व कर्मचा-यांनी याचा विचार करुन तात्काळ ती संबंधित पीडित कुटुंबाला देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष प्रमुख कुलदीप करपे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Beedबीडfarmer suicideशेतकरी आत्महत्या